आपात्कालीन परिस्थितीत हॉस्पिटलबाहेर पडण्याचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 07:53 PM2019-09-03T19:53:37+5:302019-09-03T19:56:07+5:30

आपात्कालिन परिस्थितीत हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी सतर्क रहावे, उद्भवलेल्या परिस्थितीला योग्यरीत्या सामोरा जाता यावे, यासाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत केअर हॉस्पिटल येथे मंगळवारी फायर इव्हॅकेशन ड्रील घेण्यात आली

Lessons to come out from hospital in emergencies | आपात्कालीन परिस्थितीत हॉस्पिटलबाहेर पडण्याचे धडे

आपात्कालीन परिस्थितीत हॉस्पिटलबाहेर पडण्याचे धडे

Next
ठळक मुद्देअग्निशमन विभागाची केअर हॉस्पिटल येथे मॉक ड्रील

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : आपात्कालिन परिस्थितीत हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी सतर्क रहावे, उद्भवलेल्या परिस्थितीला योग्यरीत्या सामोरा जाता यावे, यासाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत केअर हॉस्पिटल येथे मंगळवारी फायर इव्हॅकेशन ड्रील घेण्यात आली. यावेळी कर्मचारी व रुग्णांच्या नातेवाईकांना आपात्कालीन परिस्थितीत हॉस्पिटलमधून बाहेर पडण्याचे धडे देण्यात आले.
आपात्कालीन परिस्थितीत घ्यावयाची काळजी, रुग्णांची कशी मदत करावी, कसे बाहेर पडावे याचे प्रशिक्षण यावेळी देण्यात आले. मॉक ड्रीलदरम्यान रुग्णांचा नातेवाईकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अशा प्रात्यक्षिक कवायतींचे आयोजन इतर हॉस्पिटलमध्ये व्हावे, अशी इच्छा रुग्णांच्या नातेवाईकांनी यावेळी व्यक्त केली.
महापालिकेचे प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांच्या नेतृत्वात ही मॉक ड्रील आयोजित करण्यात आली. यावेळी प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे सहा स्थानानिधाकारी केशव कोठे, सुनील राऊत यांनी मॉक ड्रीलच्या कवायतींचे आयोजन केले होते. अग्निशमन विमोचक तुषार नेवारे, गोपाल तायडे, निखील भालेराव यांनी प्रात्याक्षिक साजरे केले. यावेळी केअर हॉस्पिटलचे संचालक वरुण भार्गव, रविकुमार मनाडिया, प्रशासकीय अधिकारी सतीश टाटा, लायसन्स ऑफिसर दीपक बॅनर्जी, डिझास्टर मॅनेजर व हॉस्पिटलचे कर्मचारी व अधिकारी यांच्यासह रुग्ण व त्यांचे नातेवाईक प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: Lessons to come out from hospital in emergencies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.