पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये विद्यार्थ्यांना दिले निसर्गाच्या सान्निध्यात वनसंरक्षणाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 10:29 AM2017-12-20T10:29:14+5:302017-12-20T10:29:54+5:30

महाराष्ट्रातील पेंच व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील गावांच्या मुला-मुलींसाठी निवासी निसर्ग शिक्षण शिबिर १५ व १६ डिसेंबरला आयोजित केले होते.

Lessons of protection of nature to students in Pench Tiger Project | पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये विद्यार्थ्यांना दिले निसर्गाच्या सान्निध्यात वनसंरक्षणाचे धडे

पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये विद्यार्थ्यांना दिले निसर्गाच्या सान्निध्यात वनसंरक्षणाचे धडे

Next
ठळक मुद्देसातपुडा व पेंच टायगर कन्झर्व्हेशन फाऊंडेशनचा संयुक्त उपक्र म

आॅनलाईन लोकमत
नागपूर : महाराष्ट्रातील पेंच व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील गावांच्या मुला-मुलींसाठी निवासी निसर्ग शिक्षण शिबिर १५ व १६ डिसेंबरला आयोजित केले होते. सावरा, जिझरिया आणि घोटीच्या जिल्हा परिषद शाळेतील सुमारे ५० विद्यार्थी यात सहभागी झाले. सातपुडा फाऊंडेशन व महाराष्ट्र राज्य वनविभागाच्या पेंच टायगर कन्झर्व्हेशन फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या शिबिरात मुलांना निसर्गाचे मानवी जीवनातील महत्त्व आणि त्याच्या संवर्धनाचे धडे देण्यात आले.
यावेळी एसीएफ, पूर्व पेंच, गीता नन्नावरे यांनी पेंच व्याघ्र प्रकल्पाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देतानाच वन संरक्षणाच्या गरजेवर भर दिला. वनपरिक्षेत्र अधिकारी, देवलापार रेंज, साठवणे यांनी टायगर टेल संग्रहालयाद्वारे, वाघांचे जीवन व व्यवहारांबद्दलची कथा सांगितली.
सातपुडा फाऊंडेशनचे अभिजित दत्ता, मंदार पिंगळे, बंडू उके, दिलीप लांजेवार आणि स्वयंसेवक दिव्याम वाळके यांनी जंगल सफारी, नेचर वॉक आणि पक्षी निरीक्षण, औषधी वनस्पती नर्सरी भेट, निसर्ग खेळ, पर्यावरणावर आधारित चित्रपट, गटचर्चा आणि वर्गातील व्याख्यानमाला यासारख्या विविध उपक्र मांतून मुलांमध्ये निसर्गप्रेम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. चौबोहाली रेंजचे आरएफओ नाईक यांनी विद्यार्थ्यांना एका निसर्ग पायवाटेवर नेले.
तरुण पिढीने आपल्या जंगलाचा श्रीमंत साठा सुरिक्षतपणे जोपासावा व इतरांनाही तसे करण्यास प्रेरित करावे, असे आवाहन सातपुडा फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर रिठे यांनी केले.
अशी निसर्ग शिबिरे नियमित आयोजित केली तर विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग आणि वन्यजीवांप्रती आदर निर्माण होईल, असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला.

Web Title: Lessons of protection of nature to students in Pench Tiger Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.