चला समतेचे दूत होवू या...; दीक्षाभूमीवर बार्टीच्या बुकस्टॉलचे उद्घाटन
By जितेंद्र ढवळे | Published: October 24, 2023 04:43 PM2023-10-24T16:43:09+5:302023-10-24T16:43:21+5:30
डॉ. चव्हाण यांनी दीक्षाभुमीवर येणार्या अनुयायांनी बार्टी पुस्तक स्टॉलला भेट देवून बार्टीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषांच्या जीवनावरील मौल्यवान पुस्तके खरेदी करावे असे आवाहन केले आहे.
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने 67 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दिक्षाभूमी परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषाच्या सामाजिक समता प्रस्थापित करणारे पुस्तके, डॉ. बाबासाहेब यांचे खंड, भारताचे संविधान, संविधान उद्देशिका अल्प दरात वितरीत करण्यात येणार असून. त्याचा अनुयायांनी लाभ घ्यावा आणि समतेचे दूत होण्याचे आवाहन बार्टीचे विभाग प्रमूख डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण यांनी केले. स्टॉलच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड व डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन दीक्षाभूमीवरील बुक स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बार्टी मुख्यालय, नागपूर उपकेंद्रातील, अधिकारी व कर्मचारी, समतादूत व अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. चव्हाण यांनी दीक्षाभुमीवर येणार्या अनुयायांनी बार्टी पुस्तक स्टॉलला भेट देवून बार्टीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषांच्या जीवनावरील मौल्यवान पुस्तके खरेदी करावे असे आवाहन केले आहे. यासोबतच दीक्षाभूमी स्मारकास भेट देवून डॉ. चव्हाण यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. डॉ. चव्हाण यांनी धम्मदीक्षा महोत्सव स्थळी भेट देवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समीतीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई तसेच जापन मधील भिक्खू संघाला वंदन केले.
यावेळी बार्टीच्या पुणे येथील कार्यालय अधिक्षक डॉ. संध्या नारखेडे, बार्टीचे प्रकल्प व्यवस्थापक नितीन सहारे, बार्टी नागपूरचे सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक अनिल वाळके, प्रकल्प अधिकारी तुषार सुर्यवंशी, शीतल गडलिंग, सुनीता झाडे, आकाश कुर्हाडे, दिनेश बारई, प्रकल्प समन्वयक नागेश वाहूरवाघ, सहाय्यक प्रकल्प अधिकारी सरीता महाजन, मंगेश चहांदे यांच्यासह समतादूत, बार्टीतील अधिकारी व कर्मचारी, अनुयायी मोठ्या संख्यने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन रामदास लोखंडे यांनी तर आभार अनिल वाळके यांनी मानले.