बॅडमिंटनला पूर्ण सहकार्य करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 01:23 AM2017-11-09T01:23:35+5:302017-11-09T01:24:01+5:30
महाराष्टÑ बॅडमिंटन संघटनेला राज्यात खेळाचे आयोजन करायचे झाल्यास महाराष्टÑ शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्टÑ बॅडमिंटन संघटनेला राज्यात खेळाचे आयोजन करायचे झाल्यास महाराष्टÑ शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
८२ व्या सिनियर राष्टÑीय बॅडमिंटन स्पर्धेच्या समारोपप्रसंंगी विभागीय क्रीडा संकुलात मार्गदर्शन करताना २२ वर्षांनंतर महाराष्टÑाला स्पर्धेचे यजमानपद मिळाल्याचा उल्लेख करीत, ज्यांचा खेळ टीव्हीवर पाहून प्रेरणा लाभायची त्या खेळाडूंचा खेळ प्रत्यक्षपणे पाहण्याची संधी लाभली याबद्दल आपण सर्व भाग्यवान आहोत, असे सांगितले. राष्टÑीय स्पर्धेला भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल नागपूरकरांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करीत दाद दिली.
यावेळी व्यासपीठावर भारतीय बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष आणि आसामचे मंत्री हिमांता बिस्वा सरमा, वरिष्ठ उपाध्यक्ष देवेंदर सिंग, उपाध्यक्ष मुरलीधरन, लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, आ. समीर मेघे यांच्यासह एमबीए आणि एनडीबीएचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक एमबीए अध्यक्ष अरुण लखानी यांनी केले. मुख्यमंत्र्यांसह सर्व पाहुण्यांना आयोजन समितीकडून स्मृतिचिन्ह भेट देण्यात आले. महिला एकेरीचा अंतिम सामना आटोपताच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विजेते-उपविजेते तसेच तिसरे स्थान मिळविणाºया खेळाडूंना गौरविण्यात आले. संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले.
क्रीडा संकुलात प्रथमच खेळले विश्वस्तरीय खेळाडू
कोराडी रोडवरील मानकापूरच्या विभागीय क्रीडा संकुलाची उपयुक्तता सिनियर राष्टÑीय बॅडमिंटन स्पर्धेनिमित्ताने सिद्ध झाली. संकुलात पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळांचा सहभाग असलेली राष्टÑीय स्पर्धा पार पडली. नागपूरकरांना राष्टÑीय स्पर्धेत आंतरराष्टÑीय दर्जाचा खेळ पाहता आला. विश्व क्रमवारीत दुसºया स्थानी असेलेले श्रीकांत आणि सिंधू यांच्यासह लहानथोरांचे आकर्षण असलेली ‘फुलराणी’ सायना, एच, एस. प्रणय आदींचा खेळ अगदी जवळून पाहता आला. संकुलात अनेक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते. तथापि, राष्टÑीय बॅडमिंटनच्या दिमाखदार आयोजनामुळे विभागीय संकुल खेळांसाठी किती उपयुक्त आहे, हे सिद्ध झाले.
क्षणचित्रे.....
४व्यासपीठावर राष्टÑीय कोच पद्मभूषण पुलेला गोपीचंद यांची उपस्थिती लक्षवेधी होती. त्यांचाही मुख्यमंत्र्यांनी स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.
४स्टेडियममध्ये उपस्थित गर्दीचा उत्साह ओसंडून वाहत होता. सामन्यादरम्यान टाळ्यांचा पाऊस पाडणाºया प्रेक्षकांनी वारंवार उभे राहून खेळाडूंचा उत्साह वाढविला.
४भारतीय बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष हिमांता बिस्वा सरमा यांनी आपल्या भाषणात एमबीएचे आयोजनाबद्दल कौतुक करीत हे आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट राष्टÑीय आयोजन असल्याचे सांगताच प्रेक्षकांनी बराच वेळ टाळ्या वाजवून पाठिंबा दिला.
४सामना सुरू होण्याआधी महिला एकेरीचा निर्णायक सामना खेळणाºया स्टार सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांचा मुख्यमंत्र्यांनी परिचय करून घेत त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या.
क्रीडा संकुलात उसळली गर्दी, पार्किंगचाही गोंधळ
सायना, सिंधू, श्रीकांत यांच्यासारख्या आंतरराष्टÑीय खेळाडूंचा समावेश असलेल्या ८२ व्या राष्ष्टÑीय बॅडमिंटन स्पर्धेच्या निर्णायक लढतींचा आनंद घेण्यासाठी विभागीय क्रीडा संकुलात गर्दी उसळली. शाळकरी मुलांसोबत चाहत्यांनी कुटुंबीयांसह हजेरी लावल्याने अनेकांना बाहेर ताटकळत राहाावे लागले. याचा फटका व्हीआयपींना बसला. संकुल परिसरात प्रवेश केल्याानंतर वाहन ठेवण्यास जागा अपुरी पडल्याने सामन्यांचा आनंद घेण्यासाठी अनेकांना प्रतीक्षा करावी लागली. सर्वांना मोफत प्रवेश होता. आपल्या आवडत्या खेळाडूंचा खेळ डोळ्यात साठवून घेण्यासाठी आत प्रवेश मिळेल, या आशेपोटी आलेल्या अनेकांना बाहेरूनच परत जावे लागले. अंतिम सामन्यांंचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनवर झाले. ज्यांना प्रवेश मिळाला नाही त्यांनी घरी जाऊन टीव्हीवर सामने पाहण्यात समाधान मानले. पुरस्कार वितरण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यानिमित्ताने सुरक्षा यंत्रणेने दुपारी २ वाजेपासून संकुल परिसर ताब्यात घेतल्याने गोंधळात भर पडली. विशिष्ट ठिकाणी जाता येणार नाही, अशी अट सुरक्षा यंत्रणेने घातल्यामुळे आयोजकांचाही नाईलाज झाला. फिरत्या वाहनांवरील डिजिटल स्क्रीनवर स्टेडियमबाहेर सामने पाहणाºयांचीही गर्दी होती. जे प्रेक्षक वेळेच्या आत पोहोचले त्यांचा अपवाद वगळता सुरक्षा रक्षक अन्य कुणालाही आत सोडत नव्हते. सर्व प्रवेशद्वार बंद केल्यामुळे पासेस असूनही अनेकांचा हिरमोड झाला. सायंकाळी ५ च्या सुमारास मुख्य प्रवेशद्वार पोलिसांनी बंद केले होते. एमबीए अध्यक्ष आणि आयोजन समिती प्रमुख अरुण लखानी यांनी आपल्या प्रास्ताविकेत प्रवेश मिळू न शकलेल्या प्रेक्षकांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केली.