वृक्षलागवडीतून ‘हरित महाराष्ट्र’ साकारू या : चंद्रशेखर बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 08:47 PM2019-07-01T20:47:27+5:302019-07-01T20:50:16+5:30

पर्यावरण असंतुलनावर मात करण्यासाठी महाराष्ट्राला नवी दिशा देणारा, राज्याला सुजलाम सुफलाम करणारा आणि देशात हरित महाराष्ट्र अशी नवी ओळख देणारा ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या वृक्षलागवडीतूनच उद्याचा हरित महाराष्ट्र साकार करू या, असे प्रतिपादन ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी येथे केले.

Let's to take shape of the 'Green Maharashtra' from the tree plantation : Chandrashekhar Bawankule | वृक्षलागवडीतून ‘हरित महाराष्ट्र’ साकारू या : चंद्रशेखर बावनकुळे

वृक्षलागवडीतून ‘हरित महाराष्ट्र’ साकारू या : चंद्रशेखर बावनकुळे

Next
ठळक मुद्देमिहान येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पर्यावरण असंतुलनावर मात करण्यासाठी महाराष्ट्राला नवी दिशा देणारा, राज्याला सुजलाम सुफलाम करणारा आणि देशात हरित महाराष्ट्र अशी नवी ओळख देणारा ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या वृक्षलागवडीतूनच उद्याचा हरित महाराष्ट्र साकार करू या, असे प्रतिपादन ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी येथे केले.
नागपुरातील मिहानमध्ये ‘वनमहोत्सव २०१९’ अंतर्गत ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम सोमवारी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी महापौर नंदा जिचकार, जिल्हाधिकारी तथा मिहानचे सहव्यवस्थापकीय संचालक अश्विन मुदगल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, मिहानचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, तांत्रिक सल्लागार संजय चहांदे, सुरेश काकाणी, मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) पी. कल्याणकुमार, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एस. जी. टेंभुर्णीकर, प्रधान वनसंरक्षक संजीव गौर, उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्ल, ए. पी. गिऱ्हेपुंजे, विभागीय वन अधिकारी गीता नन्नावरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपण केले.
राज्यात वृक्ष लागवडीसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना वाढदिवस, विवाहसोहळे, पुण्यतिथी अशाप्रकारच्या विशेष दिवशी रोपे भेट देऊन त्यांचे संवर्धन करावे. तसेच यामध्ये बांबू हा बहुपयोगी वृक्ष असल्याने बांबूची झाडे मोठ्या प्रमाणावर लावावीत. ‘महाजेनकोने’ महिला बचत गटांना दिलेल्या पाच एकर जागेतील बांबू वृक्षारोपण व संवर्धनातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होणार आहे. तसेच यासाठी जिल्हा नियोजन समिती आणि पाणी फाऊंडेशनकडूनही निधी मिळणार असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
कार्यक्रमाला विविध वृक्षप्रेमी, विविध सामाजिक संघटना, पर्यावरणप्रेमी, हरित सेनेचे सदस्य, वनकर्मचारी, सेंट जोसेफ हायस्कूल, जयताळाचे विद्यार्थी, पेस हॉस्पिटल ट्रेनिंग सेंटरच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या. यावेळी सीताफळ,पेरू, जांभूळ, आवळा, वड, पिंपळ, बेल, पळस, कडूनिंब, आपटा, चंदन, सिसव, बेहडा या झाडांची रोपे लावण्यात आली.
‘रोपे आपल्या दारी’ ला हिरवी झेंडी
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘रोपे आपल्या दारी’ या फिरते रोपे विक्री केंद्राला हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन केले.
यंदाही उद्दिष्टापेक्षा जास्त वृक्षारोपण होणार
यावेळी मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) पी. कल्याणकुमार यांनी प्रास्ताविकात गेल्या चार वर्षातील ५० कोटी वृक्ष लागवडीसाठीच्या नियोजनाची माहिती देताना २०१७ मध्ये चार कोटी लक्ष्य दिले होते, त्यापेक्षा जास्त ५.४३ कोटी वृक्षारोपण केले. २०१८ मध्ये दिलेल्या लक्ष्यापेक्षा जास्त (१३ कोटीऐवजी १५.८८ कोटी) वृक्षारोपण केले. तर यावर्षी ३३ कोटीच्या उद्दिष्टापेक्षा जास्त (३५ कोटी) वृक्षारोपण करू, असा विश्वास व्यक्त केला. यावर्षी नागपूर विभागाला ५ कोटी ३४ लाख तर नागपूर जिल्ह्याला ९८ लक्ष ४० हजार वृक्षारोपणाचे लक्ष्य देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. वन विभागाच्या संकेतस्थळावर जिओ टॅगिंगच्या माध्यमातून सर्व वृक्ष लागवडीची अद्ययावत माहिती छायाचित्रांसह अपलोड करत असल्याचे कल्याण कुमार म्हणाले.

Web Title: Let's to take shape of the 'Green Maharashtra' from the tree plantation : Chandrashekhar Bawankule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.