मनपाच्या १५ अधिकाऱ्यांचे प्रधान सचिवांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 12:18 AM2020-07-14T00:18:37+5:302020-07-14T00:20:02+5:30

महापालिकेच्या नगर रचना विभागाचे सहायक संचालक प्रमोद गावंडे यांना आमदार प्रवीण दटके यांनी शिवीगाळ करून धमकी दिली. याचा आमच्या सर्वांच्या मनोधैर्यावर विपरीत परिणाम झाला आहे. आम्हा अधिकाऱ्यात भीतीचे वातावरण असून नागपूर महापालिकेत काम करण्याची इच्छा नाही. त्यामुळे मनपातील प्रतिनियुक्ती, अतिरिक्त प्रभार समाप्त करून आमची सेवा मूळ सेवा विभागात प्रत्यावर्तीत करावी, अशा आशयाची मागणी महापालिकेतील १५ अधिकाऱ्यांनी सोमवारी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे.

Letter of 15 officers of the corporation to the principal secretary | मनपाच्या १५ अधिकाऱ्यांचे प्रधान सचिवांना पत्र

मनपाच्या १५ अधिकाऱ्यांचे प्रधान सचिवांना पत्र

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या नगर रचना विभागाचे सहायक संचालक प्रमोद गावंडे यांना आमदार प्रवीण दटके यांनी शिवीगाळ करून धमकी दिली. याचा आमच्या सर्वांच्या मनोधैर्यावर विपरीत परिणाम झाला आहे. आम्हा अधिकाऱ्यात भीतीचे वातावरण असून नागपूर महापालिकेत काम करण्याची इच्छा नाही. त्यामुळे मनपातील प्रतिनियुक्ती, अतिरिक्त प्रभार समाप्त करून आमची सेवा मूळ सेवा विभागात प्रत्यावर्तीत करावी, अशा आशयाची मागणी महापालिकेतील १५ अधिकाऱ्यांनी सोमवारी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे.
प्रधान सचिवांना पत्र पाठविणाऱ्यात मुख्य अभियंता उल्हास देबडवार, अतिरिक्त आयुक्त राम जोशी अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, उपायुक्त निर्भय जैन, नगर रचना विभागाचे सहायक संचालक प्रमोद गावंडे, कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी, शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवई, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, सहायक आयुक्त किरण बागडे, सुषमा मांडगे, साधना पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी हेमंत ठाकरे, हत्तीरोग अधिकारी दीपाली नासरे व नगर रचनाकार हर्षल गेडाम आदींचा समावेश आहे.

Web Title: Letter of 15 officers of the corporation to the principal secretary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.