पत्र आजचे, संदर्भ भविष्यातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:07 AM2021-03-22T04:07:36+5:302021-03-22T04:07:36+5:30

शिक्षण संचालकांकडून गलथानपणा : एनपीएसच्या अंमलबजावणीचे पत्र नागपूर : शासन स्तरावरून एखाद्या विषयाची अंमलबजावणी करीत असताना, त्या विषयाच्या संदर्भात ...

Letter today's, reference future | पत्र आजचे, संदर्भ भविष्यातील

पत्र आजचे, संदर्भ भविष्यातील

Next

शिक्षण संचालकांकडून गलथानपणा : एनपीएसच्या अंमलबजावणीचे पत्र

नागपूर : शासन स्तरावरून एखाद्या विषयाची अंमलबजावणी करीत असताना, त्या विषयाच्या संदर्भात वेळोवेळी शासनाकडून निघालेले पत्र, शासन निर्णयाचा संदर्भ म्हणून उल्लेख केलेला असतो. शिक्षण संचालक, पुणे यांनी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीबाबत काढलेल्या पत्रात ज्या पत्रांचे संदर्भ दिलेले आहेत, ते संदर्भ पत्र भविष्यातील आहे. म्हणजेच त्या संदर्भ पत्रातील तारखा अजून यायला भरपूर वेळ आहे. शिक्षण संचालकांच्या स्वाक्षरीनिशी असलेले हे पत्र सध्या शिक्षण क्षेत्रात चर्चेचा विषय ठरत आहे. या पत्रातील संदर्भपत्रांच्या दिनांकावरून संचालनालयाच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

सन २००५ नंतर शिक्षण विभागात जे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी रुजू झाले, त्यांच्यासाठी सरकारने अंशदायी पेन्शन योजना सुरू केली. परंतु शिक्षकांकडून या पेन्शनला मोठ्या प्रमाणात विरोध होत होता. त्यामुळे शासनाने अंशदायी पेन्शन योजनेचा समावेश राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत केला. त्याच्या अंमलबजावणीसाठी शिक्षण संचालक, पुणे यांनी सर्व शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी व वेतन पथक अधीक्षकांना पत्र पाठविले. १६ मार्च रोजी प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून पत्र जारी करण्यात आले. या पत्रात ११ संदर्भ पत्रांचा उल्लेख केला आहे. या संदर्भ पत्रांमधील तिसऱ्या क्रमांकावर पत्र ३१ जुलै २०२१, चौथ्या क्रमांकावर ५ ऑगस्ट २०२१, सहाव्या क्रमांकावर १८ सप्टेंबर २०२१ व सातव्या क्रमांकावर ५ ऑक्टोबर २०२१ च्या पत्रांचा उल्लेख केला आहे. सध्या मार्च महिना सुरू आहे. हे पत्र शिक्षण संचालक (प्राथमिक) द. गो. जगताप यांच्या स्वाक्षरीनिशी जारी करण्यात आले आहे.

- या आदेशातील ११ संदर्भांपैकी ४ संदर्भ हे पूर्णत: भविष्यातील तारखा टाकून काढण्यात आलेले आहेत. संदर्भ क्रमांक ३, ४, ६, ७मधील तारखा तर अजून अस्तित्त्वात आलेल्याच नाहीत. तरीही त्यांचे संदर्भ नमूद केलेले आहेत. त्यामुळे संचालनालयाचा कारभार किती भोंगळ आहे, हे दिसून येत आहे.

- हेमंत गांजरे, प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघ

- शासनाकडून डीसीपीएस धारकांची थट्टा

शासन डीसीपीएसधारकांच्या दु:खावर पांघरूण घालण्याऐवजी विविध प्रकारे त्रास देत त्यांची थट्टा करीत असल्याचे या भोंगळ कारभारावरुन दिसून येते. शासनाने या योजनेत भोंगळ कारभार केला असल्याचा हा प्राथमिक पुरावा आहे.

-मिलिंद वानखेडे, अध्यक्ष, विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ, नागपूर विभाग

Web Title: Letter today's, reference future

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.