‘लेटलतिफ’ डॉक्टरांना पाठविले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:05 AM2017-09-26T00:05:50+5:302017-09-26T00:06:16+5:30

‘लेटलतिफांना वारंवार सूचना देऊनही त्यांच्या कार्यपद्धतीत बदल होत नसल्याने सोमवारी अशा २५ टक्के डॉक्टर व कर्मचाºयांना अधिष्ठात्यांनी आल्या पावली परत घरी पाठवले, तर काहींचे वेतन थांबविले.

'Lettif' sent back to the doctor | ‘लेटलतिफ’ डॉक्टरांना पाठविले परत

‘लेटलतिफ’ डॉक्टरांना पाठविले परत

Next
ठळक मुद्देमेडिकल : वेतन कापणार, पहिल्यांदाच कठोर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘लेटलतिफांना वारंवार सूचना देऊनही त्यांच्या कार्यपद्धतीत बदल होत नसल्याने सोमवारी अशा २५ टक्के डॉक्टर व कर्मचाºयांना अधिष्ठात्यांनी आल्या पावली परत घरी पाठवले, तर काहींचे वेतन थांबविले. पहिल्यांदाच या कठोर कारवाईला अनेकांना सामोरे जावे लागल्याने उशिरा येणाºयांचे धाबे दणाणले आहे.
मेडिकलमधील खासगी प्रॅक्टिस करणाºया डॉक्टरांची यादी वैद्यकीय शिक्षण विभागाने जाहीर केल्यानंतर रुग्णालयाच्या कामकाजात काही प्रमाणात सुधारणा होतील ही अपेक्षा होती. परंतु विशेष असा काही प्रभाव दिसून येत नसल्याचे चित्र आहे. याला संबंधित काही डॉक्टरांनी गंभीरतेने घेतले नसले तरी वैद्यकीय शिक्षण विभाग अशांवर कठोर कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे, अधिष्ठातांनी वारंवार सूचना करूनही लेटलतिफांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, डॉ. निसवाडे यांनी काही दिवसांपूर्वीच सर्व डॉक्टरांना सकाळी ९.३० वाजताच्या आत रुग्णालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. परंतु सोमवारी झालेल्या कारवाईत सुमारे २५ टक्के डॉक्टर व कर्मचाºयांनी या निर्देशालाच केराची टोपली दाखविल्याचे दिसून आले. बाह्यरुग्ण विभागाकडे जाणाºया मार्गावर सकाळी १० वाजता अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे अचानक उभे झाले. अधिष्ठात्यांना अचानक मार्गावर उभे पाहत अनेकांनी तेथून पळ काढला. काहींनी दुसºया मार्गाने रुग्णालयात प्रवेश घेतला. तर जे सापडले त्यांना डॉ. निसवाडे यांनी परत घरी पाठवून त्यांचे एक दिवसाचे वेतन कापण्याचे आदेश दिले. मात्र ज्यांना घरी जाण्यास सांगूनही कामावर हजर होते त्यांच्याकडून उशिरा येण्याचे कारण लिहून देण्याच्या सूचना दिल्या. सोबतच जे वारंवार उशिरा येतात अशा काही डॉक्टरांना वैद्यकीय शिक्षण विभागासमोर उभे करण्याच्या विचारात असल्याची माहिती आहे.
सकाळी १० नंतर प्रवेशद्वार बंद करणार
रुग्णालयात वेळेचे बंधन आवश्यक आहे. अनेक जण याचे पालन करतात. परंतु काही जण याला गंभीरतेने घेत नाहीत. अशांंना आता कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. लवकरच डॉक्टरांसाठी असलेले प्रवेशद्वार सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत बंद करण्याच्या विचार आहे.
-डॉ. अभिमन्यू निसवाडे,अधिष्ठाता, मेडिकल

Web Title: 'Lettif' sent back to the doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.