हात सोडून स्टंटबाजी पडली जीवघेणी, ट्रीपलसीट मित्रांचा दुभाजकाला धडकून मृत्यू

By योगेश पांडे | Published: March 29, 2024 06:00 PM2024-03-29T18:00:32+5:302024-03-29T18:00:48+5:30

निकेश व प्रकाशचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. त्यांना पडोळे इस्पितळात नेण्यात आले. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. तर उमेशला मेडिकलमध्ये नेले असता त्याचा तेथे मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणात चालक प्रकाशविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Letting go of the hand, the stunt was fatal, triple seat friends died after hitting the divider | हात सोडून स्टंटबाजी पडली जीवघेणी, ट्रीपलसीट मित्रांचा दुभाजकाला धडकून मृत्यू

हात सोडून स्टंटबाजी पडली जीवघेणी, ट्रीपलसीट मित्रांचा दुभाजकाला धडकून मृत्यू

नागपूर : धुळवडीच्या दिवशी ऑरेंज स्ट्रीटवर भेंडे ले आऊटजवळ झालेल्या अपघाताचे कारण समोर आले आहे. ट्रीपलसीट भरधाव दुचाकी चालवत असताना चालकाने हात सोडून स्टंटबाजी सुरू केली. यातून संतुलन बिघडून दुचाकी दुभाजकाला धडकली व त्यात तीनही मित्रांचा जीव गेला. राणाप्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

प्रकाश भैय्यालाल राऊत (२५, हिरनवार ले आऊट, अष्टविनायक नगर), निकेश ज्ञानेश्वर अतकरे (२७, अमरनगर, हिंगणा), उमेश रामेश्वर शेंडे (२५, हिरनवार ले आऊट, जयताळा) अशी मृतकांची नावे आहेत. २५ मार्च रोजी धुळवडीच्या उत्साहात तिघेही जयताळा बाजाराकडून खामला बाजाराच्या दिशेने निघाले होते. त्यांची मोटारसायकल वेगातच होती. भेंडे ले आऊट चौक पार करत असतानाच प्रकाशने गाडीवरील हात सोडले आणि दुसरीकडे मागे बसलेला उमेश हा हातवारे व अंगविक्षेप करत होता. यात प्रकाशचे गाडीवरील संतुलन सुटले व दुचाकी रस्ता दुभाजकाला धडकली. वेग जास्त असल्याने दुचाकी दुभाजकाला २२ फूट घासत गेली व ढोमणे सभागृहाजवळील वीजेच्या खांबाला धडकली. धडक इतकी जोरात होती की तिघेही दुभाजकाच्या दोन्ही कडेला पडले. तर मोटारसायकल ४० फूट दूर जाऊन पडली. तिघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. घटनास्थळावरील नागरिकांनी पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. निकेश व प्रकाशचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. त्यांना पडोळे इस्पितळात नेण्यात आले. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. तर उमेशला मेडिकलमध्ये नेले असता त्याचा तेथे मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणात चालक प्रकाशविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सीसीटीव्हीमुळे समोर आले अपघाताचे कारण

हा अपघात नेमका कसा झाला याचा पोलीस शोध घेत होते. समोरील चौक तसेच ढोमणे सभागृहातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता अपघाताची दाहकता समोर आली. ऑरेंज स्ट्रीटवरील भेंडे ले आऊट चौकात सिग्नल आहे. मात्र त्याचे फारसे पालन होत नाही. तेथे वाहतूक पोलीस नावालादेखील नसतात. त्याचप्रमाणे सिग्नलच्या बाजूलाच असलेल्या फुटपाथवर मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांचे ठेले लागतात. नागरिकांनी यावर आक्षेपदेखील घेतले. मात्र मनपा व पोलिसांच्या हातावर चिरिमिरी टिकवत खाद्यपदार्थांच्या ठेलेचालकांकडून अतिक्रमण केले जाते व कुठलीही कारवाई होत नाही.

Web Title: Letting go of the hand, the stunt was fatal, triple seat friends died after hitting the divider

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.