ग्रंथालये हीच समाजाची ऊर्जा केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:17 AM2021-09-02T04:17:30+5:302021-09-02T04:17:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रात प्रगती साधायची असेल तर वाचनाशिवाय आणि शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. ...

Libraries are the energy center of the society | ग्रंथालये हीच समाजाची ऊर्जा केंद्र

ग्रंथालये हीच समाजाची ऊर्जा केंद्र

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रात प्रगती साधायची असेल तर वाचनाशिवाय आणि शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. यामध्ये ग्रंथालयाचा वाटा मौलिक आहे. ग्रंथालये हीच समाजाची ऊर्जा केंद्र आहेत, असे मत मान्यवरांनी मांडले.

उमरेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे स्थानांतरण प्रभाग क्रमांक ३ मधील आंबेडकर ले-आऊट परिसरात नुकतेच करण्यात आले. यावेळी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, माजी मंत्री राजेंद्र मुळक, आमदार राजू पारवे, नगराध्यक्ष विजयलक्ष्मी भदोरिया, उपाध्यक्ष गंगाधर फलके, माजी नगराध्यक्ष गंगाधर रेवतकर, संजय मेश्राम, वाचनालयाचे मार्गदर्शक नथ्थूजी मेश्राम, नगरसेवक सतीश चौधरी, रेणुका कामडी, शालिनी गवळी, सूरज इटनकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन विवेक गजघाटे यांनी केले. निरंजन माटे, परसराम पिल्लेवान, रामचंद्र गायकवाड, संजय गणवीर, शरद आटे, विनोद मेश्राम, राजेश वानखेडे, अमर सोनडवले आदींनी सहकार्य केले.

Web Title: Libraries are the energy center of the society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.