नागपुरात भरधाव क्रेनने घेतला अभियंत्याचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 01:02 AM2018-03-30T01:02:42+5:302018-03-30T01:03:08+5:30

मेट्रोचे काम करणाऱ्या क्रेनचालकाने मोटारसायकलस्वार अभियंत्याला चिरडल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हंसराज गुरुदास वानखेडे (वय ३०, रा. आराधना कॉलनी, नारा रोड) असे मृताचे नाव आहे. सुभाषनगर चौकाजवळ गुरुवारी सकाळी झालेल्या या भीषण अपघातामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.

Life of Engineer taken by the speedy Crane in Nagpur | नागपुरात भरधाव क्रेनने घेतला अभियंत्याचा बळी

नागपुरात भरधाव क्रेनने घेतला अभियंत्याचा बळी

googlenewsNext
ठळक मुद्देसुभाषनगरात अपघात : आरोपी क्रेनचालक गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेट्रोचे काम करणाऱ्या क्रेनचालकाने मोटारसायकलस्वार अभियंत्याला चिरडल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हंसराज गुरुदास वानखेडे (वय ३०, रा. आराधना कॉलनी, नारा रोड) असे मृताचे नाव आहे. सुभाषनगर चौकाजवळ गुरुवारी सकाळी झालेल्या या भीषण अपघातामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.
मेकॅनिकल इंजिनिअर असलेले हंसराज वानखेडे हिंगणा एमआयडीसीत एका खासगी कंपनीत कामाला होते. नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास ते त्यांच्या एमएच ४९/ए ७४०२ क्रमाकांच्या मोटारसायकलने कंपनीत जात होते. सुभाषनगर चौकाकडून हिंगणा टी-पॉर्इंटकडे जाताना न्यू मेरिडियन कॉन्व्हेंटसमोर क्रेन (जीजे.१४/एम ३६०३)च्या चालकाने वानखेडेंच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. संतुलन बिघडल्याने ते खाली पडले आणि क्रेनच्या चाकात चिरडल्या गेले. या भीषण अपघातामुळे घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. माहिती कळताच प्रतापनगर ठाण्याचा ताफा घटनास्थळी पोहोचला. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकेल रुग्णालयात पाठविला. हंसराजचे भाऊ राज यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी क्रेन चालक तारकनाथ शहा (वय ३६, रा. मुर्शिदाबाद) याच्याविरोधात गुन्हा नोंदविला. वानखेडेंचा बळी घेतल्यानंतर आरोपी शहा घटनास्थळावरून पसार झाला होता. पोलिसांनी नंतर त्याला अटक केली. हंसराजचे वडील गुरुदास वानखेडे हे वेकोलिचे सेवानिवृत्त अधिकारी आहेत. या अपघातामुळे वानखेडे कुटुंबीयांवर जबर आघात झाला आहे.
हेल्मेटही वाचवू शकले नाही जीव
वानखेडे यांनी दुचाकीवर जाताना ब्रान्डेड कंपनीचे आयएसआय मार्क असलेले हेल्मेट डोक्यात घातलेले होते. मात्र, डोक्यावरूनच चाक गेल्याने हेल्मेटचा चुराडा झाला. हेल्मेटही वानखेडेंचे प्राण वाचवू शकले नाही.

Web Title: Life of Engineer taken by the speedy Crane in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.