पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 12:33 AM2018-07-26T00:33:34+5:302018-07-26T00:34:32+5:30
सत्र न्यायालयाने चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा खून करणाºया पतीला जन्मठेप व ५००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश एस. एस. दास यांनी बुधवारी हा निर्णय दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सत्र न्यायालयाने चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा खून करणाºया पतीला जन्मठेप व ५००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश एस. एस. दास यांनी बुधवारी हा निर्णय दिला.
लक्ष्मीनारायण श्रावण किनकर (४३) असे आरोपीचे नाव असून तो लवकुशनगर, हुडकेश्वर येथील रहिवासी आहे. मयताचे नाव ऋचिका होते. आरोपी हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. तिला नेहमीच मारहाण करीत होता. त्यामुळे त्यांचा घटस्फोट झाला होता. त्यांच्या मुलगा ऋचिकासोबत रहात होता. १९ आॅक्टोबर २०१० रोजी सकाळी ७.२० च्या सुमारास ऋचिका मुलाला शाळेत सोडून दुचाकीने घरी परत येत होती. दरम्यान, आरोपीने कोतवाली पोलिसांच्या हद्दीतील नंदनवन सिमेंट रोडवर ऋचिकाला केस ओढून दुचाकीवरून खाली पाडले. तसेच, तिला चाकूने भोसकून ठार मारले. पोलीस निरीक्षक सिंग निरावडे यांनी प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात सरकारतर्फे अॅड. नितीन तेलगोटे यांनी बाजू मांडली.