कांबळे दुहेरी हत्याकांड प्रकरणात तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: July 14, 2023 01:29 PM2023-07-14T13:29:59+5:302023-07-14T13:30:33+5:30
सत्र न्यायालयाचा निर्णय
नागपूर : विशेष सत्र न्यायालयाचे न्या. एस.बी. गावंडे यांनी शुक्रवारी बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांड प्रकरणातील तीन आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. एक अल्पवयीन आरोपीला तीन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
गणेश शिवभरण शाहू हा या हत्याकांडातील मुख्य आरोपी आहे. इतर आरोपींमध्ये गणेशची पत्नी गुडिया ऊर्फ गुड्डी व भाऊ अंकित यांचा समावेश आहे. या तिघांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. ते सर्व पवनपुत्रनगर, हुडकेश्वर येथील रहिवासी आहेत. उषा कांबळे व राशी कांबळे, अशी मृतांची नावे होती. ही घटना १७ फेब्रुवारी २०१८ रोजी घडली. त्यादिवशी आरोपी गणेश व उषा कांबळे यांच्यामध्ये भिसीच्या पैशांवरून वाद झाला. त्यानंतर आरोपींनी उषा यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या दीडवर्षीय राशीचाही निर्घृण खून केला आणि त्यांचे मृतदेह उमरेड रोडवरील विहीरगावजवळच्या नाल्यात फेकून दिले. सरकारच्या वतीने विशेष वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडली. फिर्यादी रविकांत कांबळे यांचे वकील ॲड. समीर सोनवणे यांनी त्यांना सहकार्य केले.