काळ्या गुळाचा गोरखधंदा उजेडात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:36 AM2020-12-17T04:36:23+5:302020-12-17T04:36:23+5:30

उमरेड : गावठी दारूसाठी वापरल्या जाणारा काळ्या गुळाचा गोरखधंदा उमरेड पोलिसांनी उजेडात आणला आहे. याप्रकरणी गणेश दिलीप मेश्राम (३०), ...

In the light of the black jaggery scandal | काळ्या गुळाचा गोरखधंदा उजेडात

काळ्या गुळाचा गोरखधंदा उजेडात

Next

उमरेड : गावठी दारूसाठी वापरल्या जाणारा काळ्या गुळाचा गोरखधंदा उमरेड पोलिसांनी उजेडात आणला आहे. याप्रकरणी गणेश दिलीप मेश्राम (३०), विलास मजलत वाघमारे (३८) दोघेही रा. उमरेड अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी ५६ नग गुळाच्या भेल्या (५६० किलो) वाहनासह एकूण १ लाख ७२,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. उमरेड परिसरात या गुळाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असतो. शहरातील सोनेझरी शिवारात एम.एच. १५/एएस ०४०९ या क्रमांकाच्या वाहनातून सदर गुळाची अवैध वाहतूक केली जात होती. पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारावर ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे यांच्या मार्गदर्शनात भूषण मदनकर, पंकज बत्ते, तारूदत्त बोरसरे, राहुल धोंडे, प्रदीप ठाकरे आदींनी ही कारवाई केली. उमरेड पोलीस ठाण्यात ७०, ८१, मदाका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: In the light of the black jaggery scandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.