विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा
By admin | Published: July 12, 2016 12:55 AM2016-07-12T00:55:40+5:302016-07-12T00:55:40+5:30
हवामानशास्त्र विभागाने येत्या चोवीस तासांत मुसळधार पावसाचा इशरा दिला.
अकोला : विदर्भात सार्वत्रिक पावसाने दमदार हजेरी लावली असून, मागील चोवीस तासात झालेल्या पावसाने सर्वच नद्यांना पूर आला असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, १२ जूनला विदर्भासह कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
विदर्भात मागील दहा दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, शूक्रवारपासून सार्वत्रिक स्वरू पाचा पाऊस होत आहे. परंतु मागील चोवीस तासांत १0 ते ११ जुलैला सकाळी ८.३0 वाजतापर्यंत अकोला जिल्ह्याला पावसाने झोडपले असून, अकोला येथे ८४.३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. अमरावती २0 मि.मी., बुलडाणा ५८ मि.मी., ब्रह्मपुरी 0८.४ मि.मी., चंद्रपूर १६.४ मि.मी., गोंदिया 0९.८ मि.मी., नागपूर 0२. ६ मि.मी., वाशिम ३६ मि.मी., वर्धा 00 तर यवतमाळ येथे ११.0 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, ११ जुलैला सकाळी ८.३0 ते सायंकाळी ५.३0 वाजेपर्यंत अकोला २५.0 मि.मी., अमरावती २ मि.मी., बुलडाणा २६.0 मि.मी., ब्रह्मपुरी २१ मि.मी., चंद्रपूर २0 मि.मी., गोंदिया १.0 मि.मी., नागपूर २ मि.मी., वर्धा २ मि.मी. व यवतमाळ येथे ९.0 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.