नागपुरात चूल पेटवून राष्ट्रवादीने केले आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 01:07 AM2018-10-16T01:07:22+5:302018-10-16T01:10:50+5:30
सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यात शिधापत्रिकाधारकांना केरोसिन वाटप न झाल्याच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे सोमवारी आंदोलन करण्यात आले. अन्न पुरवठा कार्यालयात चक्क चूल पेटवून राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. शहराध्यक्ष अनिल अहिरकर व राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष शैलेंद्र तिवारी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यात शिधापत्रिकाधारकांना केरोसिन वाटप न झाल्याच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे सोमवारी आंदोलन करण्यात आले. अन्न पुरवठा कार्यालयात चक्क चूल पेटवून राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. शहराध्यक्ष अनिल अहिरकर व राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष शैलेंद्र तिवारी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
दसरा, धम्मचक्र प्रवर्तन दिन, दिवाळी यांच्या तोंडावर केरोसिन न मिळाल्यामुळे गरीब कुटुंबांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. सोबतच काळाबाजार होत असल्याने धान्यवाटपदेखील होत नसल्याचे चित्र आहे, असा आरोप राष्ट्रवादीतर्फे करण्यात आला. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन सोपविण्यात आले व ४८ तासांत केरोसिन वाटप सुरू झाले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. आंदोलनात राकेश बोरीकर, अरविंद ढेंगरे, अनिल बोकडे, तौसिफ शेख, राहुल पांडे, समीर शेख, अमित जिभकाटे, रुद्र धाकडे, राजेश मासूरकर, दीप पंचभाये, रवी पराते, लोकेश ठाकूर, राम निखारे इत्यादी कार्यकर्ते सहभागी झाले होते.