वर्धा जिल्ह्यात जाणारी दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:09 AM2021-05-08T04:09:01+5:302021-05-08T04:09:01+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क बुटीबाेरी : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर-वर्धा मार्गावरील आसाेली-सावंगी (ता. हिंगणा) शिवारात केलेल्या कारवाईमध्ये दारूबंदी असलेल्या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
बुटीबाेरी : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर-वर्धा मार्गावरील आसाेली-सावंगी (ता. हिंगणा) शिवारात केलेल्या कारवाईमध्ये दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात विक्रीसाठी नेली जाणारी देशी दारू पकडली. यात कारचालकास अटक करण्यात आली असून, कार व दारूच्या पेट्या असा एकूण १० लाख ७० हजार ५६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी(दि. ६)रात्री करण्यात आली.
मंगेश तेजराम राणा (३५, रा. दहेगाव-गाेसावी, जिल्हा वर्धा) असे अटक करण्यात आलेल्या आराेपी कारचालकाचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बुटीबाेरी परिसरात गस्तीवर हाेते. त्यांना नागपूरहून वर्धा जिल्ह्यात दारू नेली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे या पथकाने नागपूर-वर्धा मार्गावरील आसाेली-सावंगी शिवारात नाकाबंदी केली. यात त्यांनी वर्धा शहराच्या दिशेने जाणारी एमएच-४९/बीबी-९४१५ क्रमांकाची कार थांबवून झडती घेतली.
त्या कारमध्ये त्यांना देशीदारूच्या २१ पेट्या आढळून आल्या. ती दारूची अवैध वाहतूक असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच त्यांनी कारचालक मंगेश राणा यास अटक केली. शिवाय, त्याच्याकडून १० लाख रुपयाची कार आणि ७० हजार ५६० रुपये किमतीची दारू असा एकूण १० लाख ७० हजार ५६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली. याप्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस हवालदार गजेंद्र चाैधरी, महेश जाधव, अमृत किनगे, राेहन डाखाेरे यांच्या पथकाने केली.