वाडी, कोराडी, कामठी आणि हिंगण्यातील मद्याची दुकाने बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 12:25 AM2020-05-17T00:25:12+5:302020-05-17T00:32:06+5:30

ठिकठिकाणच्या दुकानावर मद्यपींची झालेली गर्दी कोरोनाचा धोका वाढवू शकते, हे ध्यानात घेऊन तो धोका टाळण्यासाठी नागपूर पोलीस आयुक्तालया अंतर्गत येणाऱ्या चार शहरातील मद्याची दुकाने बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी जारी केला आहे. त्यानुसार आता या दुकानांमधून फक्त ऑनलाईन सेवा अर्थात घरपोच मद्य सेवा मिळणार आहे.

Liquor shops in Wadi, Koradi, Kamathi and Hinganya closed | वाडी, कोराडी, कामठी आणि हिंगण्यातील मद्याची दुकाने बंद

वाडी, कोराडी, कामठी आणि हिंगण्यातील मद्याची दुकाने बंद

Next
ठळक मुद्देघरपोच मद्यसेवा मिळणार : जिल्हाधिकाऱ्यांनी काढले सुधारित आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ठिकठिकाणच्या दुकानावर मद्यपींची झालेली गर्दी कोरोनाचा धोका वाढवू शकते, हे ध्यानात घेऊन तो धोका टाळण्यासाठी नागपूर पोलीस आयुक्तालया अंतर्गत येणाऱ्या चार शहरातील मद्याची दुकाने बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी जारी केला आहे. त्यानुसार आता या दुकानांमधून फक्त ऑनलाईन सेवा अर्थात घरपोच मद्य सेवा मिळणार आहे.
नागपूर महापालिकेचे क्षेत्र वगळता नागपूर जिल्ह्यातील मद्याची दुकाने सुरू करण्याला जिल्हाधिकारी कार्यालयातून परवानगी मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी नागपूर महापालिकेचे क्षेत्र वगळता जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या मद्याच्या दुकानातून मद्याची विक्री सुरू झाली. यात नागपूर महापालिकेच्या क्षेत्रात नसलेली मात्र नागपूर पोलीस आयुक्तांच्या अधिकार क्षेत्रात असलेल्या वाडी, कोराडी, कामठी आणि हिंगणा शहरातील मद्याच्या दुकानाचा समावेश होता. या दुकानांवर नागपुरातील मद्यपिंनी शुक्रवारी सकाळपासून एकच गर्दी केली. दोन दोन किलोमीटर पर्यंत अनेक मद्याच्या दुकानात रांगा बघायला मिळाल्या. मद्यपींची उडालेली झुंबड लक्षात घेता कोरोना संसर्गाचा धोका होऊ शकतो, हे ध्यानात आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री सुधारित निर्णय घेतला. त्यानुसार नागपूर पोलीस आयुक्तलयांतर्गत येणाऱ्या वाडी, कोराडी, कामठी आणि हिंगणा या शहरात मद्याची खुली विक्री करणाऱ्या दुकानावर बंदी घालण्यात आली. या शहरातील दुकानातून केवळ होम डिलिव्हरी अर्थात आॅनलाईन दारूविक्री देण्याचा आदेश जारी करण्यात आला.

मद्यपी सैरभैर
मद्याची दुकाने सुरू झाल्याचा काही तासानंतरच हा नवीन आदेश निघाल्यामुळे पुन्हा एकदा मद्यपींच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यांची अवस्था सैरभैर झाली आहे.
कारण होम डिलिव्हरी मागून घेण्यासाठी अनेकांची तयारी नाही. ते दोन दोन तास रांगेत उभे राहून मद्य घ्यायला प्राधान्य देतात. त्यामुळे आता नागपूर शहरातील हजारो मद्यशौकिन शहराच्या आजूबाजूला असलेल्या नागपूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणच्या दुकानाकडे धाव घेण्याची शक्यता आहे.

देशीला परवानगी!
पोलीस आयुक्त यांच्या कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या भागात आता केवळ ऑनलाईन विदेशी मद्य मिळणार असले तरी या क्षेत्रातील देशी दारूच्या दुकानात देशी दारूची विक्री सुरू राहणार आहे.

Web Title: Liquor shops in Wadi, Koradi, Kamathi and Hinganya closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.