नगर परिषद व नगर पंचायत पोट निवडणुकी दरम्यान मद्य विक्रीची दुकाने बंद राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 11:04 PM2019-12-27T23:04:09+5:302019-12-27T23:05:14+5:30

नगर परिषद व नगर पंचायतच्या पोटनिवडणूक क्षेत्रामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मद्य विक्री बंद राहील.

The liquor shops will remain closed during the municipal council and Nagar Panchayat bye polls | नगर परिषद व नगर पंचायत पोट निवडणुकी दरम्यान मद्य विक्रीची दुकाने बंद राहणार

नगर परिषद व नगर पंचायत पोट निवडणुकी दरम्यान मद्य विक्रीची दुकाने बंद राहणार

Next


लोकमत  न्यूज  नेटवर्क 
नागपूर : नगर परिषद व नगर पंचायतच्या पोटनिवडणूक क्षेत्रामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मद्य विक्री बंद राहील. नागपूर जिल्ह्यातील भिवापूर नगर पंचायतीच्या प्रभाग क्र. ४ मधील तसेच उमरेड नगर परिषदेच्या प्रभाग क्र. ११ (अ) साठी सदस्यपदाची पोटनिवडणूक रविवार, २९ डिसेंबर २०१९ रोजी होणार आहे.
निवडणूक होणार असलेल्या नगर पंचायत, भिवापूर तसेच नगर परिषद, उमरेड मधील मतदानाचे निर्वाचन क्षेत्रातील मतदानाच्या अगोदरच्या दिवशी २८ डिसेंबर २०१९ (संपूर्ण दिवस), मतदानाच्या दिवशी रविवार, २९ डिसेंबर (संपूर्ण दिवस) तसेच मतमोजणीच्या दिवशी सोमवार, ३० डिसेंबर(संपूर्ण दिवस) रोजी मद्य विक्री बंद राहील.
नगर परिषद व नगर पंचायतच्या पोटनिवडणुकी दरम्यान शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरिता मतदानाच्या क्षेत्रातील किरकोळ व ठोक मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवण्याबाबत महाराष्ट्र देशी दारू नियम,१९७३ च्या नियम २६ (२) अन्वये विदेशी मद्य (रोखीने विक्री) बंद राहतील. या आदेशाचा भंग केल्यास कठोर कार्यवाही करण्यात येईल. याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आदेशित केले आहे.

Web Title: The liquor shops will remain closed during the municipal council and Nagar Panchayat bye polls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.