चंद्रपूर जिल्ह्यात जाणारा दारूसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:07 AM2021-06-30T04:07:11+5:302021-06-30T04:07:11+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क बुटीबाेरी : चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटविण्यात आली असली तरी नागपूर जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात दारूची ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
बुटीबाेरी : चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटविण्यात आली असली तरी नागपूर जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात दारूची चाेरटी वाहतूक सुरू आहे. त्यातच बुटीबाेरी पाेलिसांनी केलेल्या कारवाईत दारूची अवैध वाहतूक करणारी कार पकडली असून, त्यातील ५८ हजार ३२० रुपये किमतीच्या विदेशी दारूसह एकूण ५ लाख ५८ हजार ३२० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुटीबाेरी परिसरात साेमवारी (दि.२८) करण्यात आली.
चंद्रपूर जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात दारूची चाेरटी वाहतूक केली जाणार असल्याची माहिती बुटीबाेरी पाेलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे त्यांनी बुटीबाेरी परिसरात नाकाबंदी सुरू केली. दरम्यान, एमएच-३४/बीएफ-२४५२ क्रमांकाच्या कारला थांबवून तपासणी केली असता, कारमध्ये विविध कंपन्यांची विदेशी दारू व बीअर आढळून आली. ही दारूची अवैध वाहतूक असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच पाेलिसांनी आराेपी कारचालक राजेश राधेश्याम साेनी (५०, रा. पठाणपुरा राेड, पाटील भट्टीच्या मागे, चंद्रपूर) याच्याविरुद्ध गुन्हा नाेंदवून कार व दारूसाठा असा एकूण ५ लाख ५८ हजार ३२० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी आराेपी कारचालकाविरुद्ध कलम ६५ अ, ६५ ई मुंबई दारूबंदी कायदा, भादंवि कलम १०९ अन्वये गुन्हा नाेंदविला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पाेलीस निरीक्षक साखरकर करीत आहेत.