अपात्र आमदार प्रकरणाच्या सुनावणीचे लाईव्ह प्रक्षेपण करा; विजय वडेट्टीवार यांची मागणी
By कमलेश वानखेडे | Published: September 23, 2023 09:38 AM2023-09-23T09:38:59+5:302023-09-23T09:39:19+5:30
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून मागणी
नागपूर: शिवसेनेतील अपात्र आमदार प्रकरणाची सुनावणी ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे महाराष्ट्राच्या जनतेपुढे करण्यात यावी, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहून केली आहे.
विजय वडेट्टीवार यांनी पत्रात म्हटले आहे की,राज्याच्या इतिहासातील मोठ्या राजकीय बंडखोरी प्रकरणातील आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण हे विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित आहे. लोकशाही व न्यायप्रिय महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष सुनावणीकडे लागले आहे .संवैधानिक संस्था, संवैधानिक पदे आणि एकंदरीत लोकशाही व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचे लाईव्ह प्रक्षेपण करावे. विधानसभा अध्यक्ष ही मागणी मान्य करून आपल्या पारदर्शक कारभाराचा परिचय देतील अशी आशाही त्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.
शिवसेनेतील अपात्र आमदार प्रकरणाची सुनावणी ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे महाराष्ट्राच्या जनतेपुढे करण्यात यावी.
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) September 23, 2023
राज्याच्या इतिहासातील मोठ्या राजकीय बंडखोरी प्रकरणातील आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण हे विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित आहे. लोकशाही व न्यायप्रिय महाराष्ट्रातील जनतेचे… pic.twitter.com/h0z4LCuB4I