अवैध शिकारी रोखण्यासाठी लाइव्ह वायर डिटेक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:08 AM2021-06-25T04:08:24+5:302021-06-25T04:08:24+5:30
नागपूर : वन क्षेत्रातून जाणाऱ्या उच्च दाबाच्या लाईनवर हूक अडकवून वन्य प्राण्यांच्या शिकारी होण्याच्या घटना नेहमीच घडत असतात. मात्र ...
नागपूर : वन क्षेत्रातून जाणाऱ्या उच्च दाबाच्या लाईनवर हूक अडकवून वन्य प्राण्यांच्या शिकारी होण्याच्या घटना नेहमीच घडत असतात. मात्र आता यावर उपाय सापडला आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विकसित केलेले लाईव्ह वायर डिटेक्टर हे उपकरण शोधण्यात आले आहे.
वन क्षेत्रात विजेचा सापळा लावून होणाऱ्या शिकारीच्या घटना हे वन विभागासाठी आव्हानात्मक काम ठरले आहे. पोलीस, वन कर्मचारी, महावितरणचे कर्मचारी गस्त घालून असा प्रकार हाणून पाडत असले तरी हे अत्यंत धोकादायक असते. यावर उपाय म्हणून डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यूएफ-इंडिया आणि अटल इनोव्हेशन सेंटरकडून वन विभागाला २० लाईव्ह वायर डिटेक्टर उपकरण मिळाले आहेत. डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यूएफ-इंडियाचे अजिंक्य भटकर यांनी गुरुवारी प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव) नितीन काकोडकर यांना ही उपकरणे सोपविली.
...महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विकसित केले उपकरण
वरिष्ठ प्रकल्प अधिकारी अजिंक्य भटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाईव्ह वायर डिटेक्टर कुप्पम अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी विकसित केले आणि शोधून काढले.
...