वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये ‘लिव्हर ट्रान्सप्लान्ट’
By admin | Published: June 18, 2017 02:11 AM2017-06-18T02:11:50+5:302017-06-18T02:11:50+5:30
वैद्यकीय सेवेत अग्रणी असलेल्या वोक्हार्ट हॉस्पिटलच्या नागपूर केंद्रात येत्या दोन महिन्यांमध्ये रुग्णाचे लिव्हर (यकृत)
अनुपम वर्मा : दोन महिन्यात उपलब्ध होणार ही सोय
नागपूर : वैद्यकीय सेवेत अग्रणी असलेल्या वोक्हार्ट हॉस्पिटलच्या नागपूर केंद्रात येत्या दोन महिन्यांमध्ये रुग्णाचे लिव्हर (यकृत) आणि पॅन्क्रियासच्या ट्रान्सप्लांटची (प्रत्यारोपण) सोय उपलब्ध होणार आहे. ही माहिती वोक्हार्ट समूहाचे अध्यक्ष अनुपम वर्मा यांनी दिली.
‘लोकमत’शी केलेल्या विशेष चर्चेत ते बोलत होते. अनुपम वर्मा म्हणाले, यकृत प्रत्यारोपणाला घेऊन काही शासकीय मंजुरी येणे बाकी आहे. ते प्रक्रियेमध्ये आहे. याला लवकरच मंजुरी मिळेल. साधारण दोन महिन्यांमध्ये आम्ही रुग्णांना ही सोय नागपुरातच उपलब्ध करून देऊ. ते म्हणाले की, येथे मुंबई आणि नागपुरातील प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजिस्ट यकृत प्रत्यारोपण करतील. नागपूरच्या या सेंटरवर आतापर्यंत सुमारे १०० मूत्रपिंड (किडनी) प्रत्यारोपण यशस्वी झालेले आहेत.
वर्मा म्हणाले, वोक्हार्ट हॉस्पिटल हे कमी खर्चात गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहे. वेळेत जर रुग्ण डॉक्टरांवर जवळ पोहचल्यास, तर कमी खर्चात त्याच्यावर पूर्ण उपचार करणे शक्य होते. परंतु बऱ्याच कालावधीपर्यंत आजाराकडे दुर्लक्ष केल्यास रुग्ण गंभीर होऊन उपचाराचा खर्च वाढतो. स्वस्त उपचाराच्या स्वरुपात गुणवत्तेशी करार करणे, यावर वोक्हार्टचा विश्वास नाही, असेही ते म्हणाले.
विदर्भ हे भविष्यात ‘मेडिकल टुरिझम’ होणार का, या प्रश्नावर वर्मा म्हणाले, येथे चांगले परिणाम दिसून येऊ शकतील. परंतु हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील शहरांशी जुळलेले नसल्याच्या कारणामुळे सुरुवातीला काही समस्या येण्याची शक्यता आहे. वोक्हार्ट हॉस्पिटलचे सामाजिक दायित्व या संबंधी ते म्हणाले, हॉस्पिटलच्यावतीने वेळोवेळी विविध संस्थांच्या मदतीने आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाते. (वा. प्र.)
जराशी महागडी
होऊ शकते सेवा
‘जीएसटी’नंतर उपचारातील खर्चामध्ये वाढ होऊ शकते का, यावर वर्मा म्हणाले, आरोग्य सेवेला ‘जीएसटी’पासून दूर ठेवण्यात आले आहे. परंतु याचा काहीसा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. कारण उपकरण, सेवा करातील वाढीमुळे उपचाराच्या खर्चात जराशी वाढ होण्याची शक्यता आहे. हृदयरोगाच्या शस्त्रक्रियेत कमजोर रक्तवाहिन्या उघडण्यासाठी वापरण्यात येणारे उपकरण, स्टेंट्सच्या किमती सरकारने कमी केल्या आहेत. यावर ते म्हणाले, यात फार कमी ‘मार्जिन’ असते. यामुळे शस्त्रक्रियेचा खर्च कमी होत नाही. ते म्हणाले, स्वस्त स्टेंटस् पूर्वीपासून बाजारात आहेत, परंतु शस्त्रक्रियेच्या दरम्यान डॉक्टर रुग्णाची स्थिती पाहून चांगल्या दर्जाच्या स्टेंटस्च्या वापरावर जोर देतात.