पशुधनाच्या आरोग्य विषयक सुविधा तत्काळ मिळणार ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:11 AM2021-09-12T04:11:17+5:302021-09-12T04:11:17+5:30

नागपूरसह छत्तीसगड, मध्यप्रदेशातील पशुधनाला फायदा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पशू वैद्यकीय चिकित्सालयीन संकुलामुळे प्राण्यांच्या आरोग्य विषयक शस्त्रक्रिया ...

Livestock health care facility available immediately () | पशुधनाच्या आरोग्य विषयक सुविधा तत्काळ मिळणार ()

पशुधनाच्या आरोग्य विषयक सुविधा तत्काळ मिळणार ()

Next

नागपूरसह छत्तीसगड, मध्यप्रदेशातील पशुधनाला फायदा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पशू वैद्यकीय चिकित्सालयीन संकुलामुळे प्राण्यांच्या आरोग्य विषयक शस्त्रक्रिया व औषधोपचाराची सुविधा मिळणार आहे. त्याचबरोबर नागपूरसह छत्तीसगड, मध्यप्रदेशातील पशुधनाला याचा फायदा मिळेल, असे प्रतिपादन दुग्ध व्यवसाय विकास, पशुसंवर्धन व क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी शनिवारी येथे केले.

राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत ६ कोटी ९१ लाख रुपये निधी खर्चून पशू वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात बांधण्यात आलेल्या पशू वैद्यकीय चिकित्सालयीन संकुलाचे लोकार्पण केंद्रीय रस्ते विकास व महामार्ग परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी अध्यक्षीय भाषणात केदार बोलत होते. खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार अभिजीत वंजारी, मापसूचे कुलगुरु डॉ. ए. एम. पातुरकर, पशू वैद्यकीय महाविद्यालयाचे ए. पी. सोमकुवर, कार्यकारी परिषदेचे डॉ. सुधीर दिवे, डॉ. संदीप इंगळे, डॉ. वैद्य, डॉ. दुधलकर यावेळी उपस्थित होते.

मध्य भारतात प्राण्यांच्या आरोग्य विषयक सुविधा व औषधोपचारासाठी हे एकमेव संकुल असल्याचे सांगताना केदार यांनी शेळी व कुक्कुट पालनावर शासनाचा अधिक भर राहणार असून विदर्भातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला यामुळे निश्चितच चालना मिळणार आहे. शेळीचे दूध आरोग्यवर्धक आहे. त्यामुळे ‘सानेन’ या प्रजातीच्या शेळीचे पालन करुन दुग्ध उत्पादन वाढीवर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पशुपालकांसाठी ‘एम्स किसान पोर्टल’ चे उद्घाटन यावेळी करण्यात आले. प्रास्ताविक सोमकुवर यांनी केले तर आखरे यांनी आभार मानले.

-बॉक्स

-मामा तलावामध्ये मत्स्यपालनाला चालना द्या

- नितीन गडकरी

विदर्भात ६,५०० मामा तलाव आहेत. त्यामध्ये मत्स्यपालन केल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण होईल, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. सर्व सुविधायुक्त असे अत्याधुनिक पशू वैद्यकीय चिकित्सालयीन संकुल नागपूर येथे झाले. त्यामुळे प्राण्यांना आरोग्य विषयक सोयीसुविधा मिळून बाहेरुन उपचार करण्याची गरज भासणार नाही, असेही ते म्हणाले.

Web Title: Livestock health care facility available immediately ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.