नागपुरात चार जलकुंभाचे हस्तांतरण रखडल्याने ७० टँकरचा बोजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 08:03 PM2020-06-13T20:03:06+5:302020-06-13T20:05:58+5:30

नासुप्रच्या माध्यमातून वांजरा, कळमना, नारा व चिंचभवन जलकुंभांचे बांधकाम करण्यात आले. परंतु यात तांत्रिक त्रुटी असल्याने जलकुंभांचे हस्तांतरण रखल्याने महापालिकेला ६० ते ७० टँरवर खर्च करावा लागत आहे.

Load of 70 tankers due to delay in transfer of four water tanks in Nagpur | नागपुरात चार जलकुंभाचे हस्तांतरण रखडल्याने ७० टँकरचा बोजा

नागपुरात चार जलकुंभाचे हस्तांतरण रखडल्याने ७० टँकरचा बोजा

Next
ठळक मुद्देवांजरा, कळमना, नारा व चिंचभवन जलकुंभाची किरकोळ कामे शिल्लक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील सर्व भागाला पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, यासाठी जेएनएनयूआरएम व अमृत योजनेच्या माध्यमातून शहराच्या विविध भागात जलवाहिन्या टाकणे, जलकुंभांची कामे हाती घेण्यात आली. नासुप्रच्या माध्यमातून वांजरा, कळमना, नारा व चिंचभवन जलकुंभांचे बांधकाम करण्यात आले. परंतु यात तांत्रिक त्रुटी असल्याने जलकुंभांचे हस्तांतरण रखल्याने महापालिकेला ६० ते ७० टँरवर खर्च करावा लागत आहे.
शहराला पाणीपुरठा होणाऱ्या पेंच प्रकल्पात पुरेसा जलसाठा असला तरी शहराच्या सर्व भागात नळाचे नेटवर्क नसल्याने मोठ्या प्रमाणात टँकरव्दारे पाणीपुरवठा करावा लागतो. यात वाठोडा, दाभा, भरतवाडा, हुडकेश्वर नरसाळा, टेका नाका, इंदोरा, पारडी, दिघोरी, पिपळा, पारडी आदी वस्त्यांचा समावेश आहे.
महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असताना जलकुंभाचे हस्तांतरण रखडल्याने महापालिकेला हकनाक ६० ते ७० टँकरवर खर्च करावा लागत आहे.

१५ ऑगस्टपर्यंत जलकुंभांचे हस्तांतरण
वांजरा, कळमना, नारा व चिंचभवन आदी भागातील पाणीटंचाई विचारात घेता या चार जलकुंभांचे शिल्लक असलेले बांधकाम पूर्ण करून १५ ऑगस्टपर्यंत जलकुंभ मनपाला हस्तांतरित करण्याचे निर्देश नासुप्रला दिले आहेत. या संदर्भात शुक्रवारी नासुप्र व मनपाच्या जलप्रदाय विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. जलकुंभावरून पाणीपुरवठा सुरू झाला तर ६० ते ७०टँकर कमी होतील. यामुळे मनपाची आर्थिक बचत होइल.
पिंटू झलके, अध्यक्ष स्थायी समिती ,मनपा

अमृत योजनेतून ४५ जलकुंभांचे काम
शहरालगतच्या पाणीपुरवठा होत नसलेल्या भागासाठी केंद्र सरकार पुरस्कृत २७३ कोटींच्या अमृत पाणीपुरवठा योजनेची २०१६ मध्ये घोषणा झाली. २७३.७८ कोटी कोटींच्या या योजनेतून शहराच्या विविध भागात जलवाहिन्यांटचे जाळे निर्माण करणे व जलकुंभ निर्माण आदी कामांचा समावेश होता. यातील ४५ जलकुंभांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

Web Title: Load of 70 tankers due to delay in transfer of four water tanks in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.