गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाचा भार १० कर्मचाऱ्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 09:37 PM2020-12-17T21:37:21+5:302020-12-17T21:38:58+5:30

Gorewada Zoo , nagpur news आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयाची व्यवस्था सांभाळायला प्राथमिक स्तरावर तज्ज्ञांसह किमान १०० कर्मचाऱ्यांची गरज आहे. मात्र सध्या हा भार केवळ १० कर्मचाऱ्यांकडून वाहून घेतला जात आहे.

Load of Gorewada Zoo on 10 staff | गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाचा भार १० कर्मचाऱ्यांवर

गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाचा भार १० कर्मचाऱ्यांवर

Next
ठळक मुद्देगरज १०० ची, तज्ज्ञांचीही वानवा : एस्सेल वर्ल्डनेही जबाबदारी सोडली

लोकमत  न्यूज  नेटवर्क 

नागपूर : गोरेवाड्यात विकसित झालेले आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय लवकरच पर्यटकांसाठी खुले होणार आहे. मात्र उल्लेख आंतरराष्ट्रीय असला तरी व्यवस्था मात्र ‘लोकल’ हून निम्नस्तराची असल्याचे दिसते. आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयाची व्यवस्था सांभाळायला प्राथमिक स्तरावर तज्ज्ञांसह किमान १०० कर्मचाऱ्यांची गरज आहे. मात्र सध्या हा भार केवळ १० कर्मचाऱ्यांकडून वाहून घेतला जात आहे.

२५ हेक्टरमध्ये पसरलेले हे वनक्षेत्र जंगल सफारी म्हणून विकसित करण्यात आले आहे. पर्यटकांसाठीही ही मोठी संधी ठरणार आहे. नुकतेच राजकुमार वाघाला या अधिवासात मुक्त करण्यात आले असून लवकरच वाघिणीसह काही अस्वल व बिबट्यांनाही सोडण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने व्यवस्थापनाचा अभाव असल्याचे दिसते. मोठ्या प्रमाणात हरीण आहेत. तज्ज्ञांच्या मते येणाऱ्या पर्यटकांच्या व्यवस्थेसह प्राण्यांचे खाणेपिणे, त्यांची नियमित आराेग्य तपासणी, वन्यजीव-पर्यटकांचा समन्वय, एखादी दुर्घटना हाेऊ नये म्हणून तातडीच्या उपाययाेजना अशा अनेक गाेष्टींचे व्यवस्थापना करण्यासाठी निश्चितच एक्सपर्ट मनुष्यबळाची गरज आहे. तज्ज्ञ डाॅक्टरांची टीम, पाेषण तज्ज्ञ, किपर्स, प्राण्यांना अन्नपुरवठा करणारे कर्मचारी, स्वच्छतेची जबाबदारी सांभाळणारे अशा किमान १०० कर्मचाऱ्यांची गरज आज येथे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

सध्या कार्यरत

- एफडीसीएमचे एक डीएफओ, दाेन एसीएफ, ४ आरएफओ, ४ फाॅरेस्टर व ६ गार्डवर प्राणिसंग्रहालयाची जबाबदारी आहे.

- न्यायालयाच्या निर्देशानुसार १० स्थानिक कर्मचाऱ्यांना कामावर घेतले आहे. हेच १० लाेक प्राणिसंग्रहालयात प्रत्यक्ष काम करीत आहेत. प्राण्यांचा अन्नपुरवठा व स्वच्छतेची जबाबदारी सांभाळतात. उर्वरित २५ ते ३० मुले अद्याप नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

- प्राण्यांच्या आराेग्य तपासणीची जबाबदारी माफसूअंतर्गत वन्यजीव संशाेधन व प्रशिक्षण संस्थेच्या पाच तज्ज्ञ डाॅक्टरांनी घेतली आहे.

एस्सेल वर्ल्डने अर्ध्यात झटकले

महाराष्ट्र वनविकास महामंडळ (एफडीसीएम) आणि एस्सेल वर्ल्ड यांनी संयुक्तपणे गाेरेवाडा प्राणिसंग्रहालय विकासाची आणि चालविण्याची जबाबदारी घेतली हाेती. मात्र काही महिन्यांपूर्वी एस्सेलने करार माेडून जबाबदारी झटकली. एवढेच नाही तर तारण ठेवलेले सिक्युरिटी डिपाॅझिटही काढून घेतल्याची माहिती आहे. एफडीसीएमची एवढी यंत्रणा असताना एस्सेलने असे का केले, याचे उत्तर एफडीसीएमकडे नाही.

त्या तीन कर्मचाऱ्यांचा भार कशासाठी

एस्सेल वर्ल्डने आपल्या साेयीनुसार एक क्युरेटर, एक अभियंता व आणखी एका व्यक्तीची नियुक्ती केली हाेती. त्यांच्या पगारावर प्रत्येकी एक असे ३ लाख रुपये खर्च हाेतात. एस्सेलने साेडल्यानंतरही त्यांची नियुक्ती कायम आहे. एकीकडे आर्थिक भार हाेत असल्याने एफडीसीएम प्रतीक्षेत असलेल्या स्थानिक मुलांची नियुक्ती पुढे ढकलत असताना या कर्मचाऱ्यांचा भार कशासाठी, हा प्रश्न उपस्थित हाेताे.

अपुऱ्या मनुष्यबळात व तज्ज्ञांशिवाय वर्ल्ड लेव्हलच्या प्राणिसंग्रहालयाचे व्यवस्थापन सांभाळणे कठीण आहे. प्रश्न पर्यटक व प्राण्यांच्याही व्यवस्थेचा आहे. एखादी दुर्घटना झाल्यास जबाबदार काेण राहील. ही बाब गंभीरपणे घ्यायला हवी.

- कुंदन हाते, मानद वन्यजीव सदस्य

Web Title: Load of Gorewada Zoo on 10 staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.