बँकांना कुलूप, रस्त्यावर घोषणाबाजी
By admin | Published: January 9, 2016 03:40 AM2016-01-09T03:40:15+5:302016-01-09T03:40:15+5:30
शहरातील अनेक बँकांना शुक्रवारी कुलूप लावलेले होते. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक व्यवहारात अडचणी आल्या.
संपात हजारो कर्मचारी सहभागी : दिवसभर कामकाज ठप्प
नागपूर : शहरातील अनेक बँकांना शुक्रवारी कुलूप लावलेले होते. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक व्यवहारात अडचणी आल्या. तर बँक कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर येऊन नारेबाजी केली. स्टेट बँक आॅफ इंडिया व असोसिएट बँक व्यवस्थापनादरम्यान झालेल्या द्विपक्षीय कराराला घेऊन बँक कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. या कराराला विरोध करण्यासाठी आॅल इंडिया बँक इम्प्लॉईज असोसिएशनच्या नेतृत्वात संप पुकारून कर्मचाऱ्यांनी बँक आॅफ इंडियाच्या मुख्य शाखेसमोर निदर्शने केली.
एमबीईए चे उपमहासचिव जयवंत गुर्वे, संघटन सचिव मिलिंद वासनिक, सुरभी शर्मा, वेंडिल अय्यर, वीरेंद्र गेडाम यांनी नेतृत्व केले. सुरवातीला ए.बी. बर्धन यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संपात सुरेश बोबाटे, वंदना मुजुमदार, विद्या जोशी, अशोक अतकरे, एस.पी. तिवारी, पी.जी. मेश्राम, गुणवंत भुजाडे, रवी जोशी, विजय ठाकूर, अरविंद कुराडकर, पंकज शिंपी, रमेश चौधरी, एस.पी. राव, जे. राधाक्रिष्णन, अंजली महाजन, रमेश असनानी, दर्शन नायडू, किशोर बिरेवार, अरुण कुंभारे, किशोर चिचघरे, अरुण कुथे, रमेश पिंपरकर, के. डी. खापरे, नरेंद्र भुजाडे, विकास शेगोकार, संदीप पाली, मो. अश्फाक, विजय जोध, सरोज कनोजे, स्वाती रंगारी, प्रीती सोनुले, शांती बडिया, किरण हेगे, विशाल तिवारी, श्रीधर बोरकर, किशोर चिचघरे, निर्मला सोरटे, पंकज गजभिये, आरती किलेदार, राकेश माहुले, प्रवीण सहारे, स्वाती सपाटे, अनुजा बेले आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
बँक कर्मचाऱ्यांच्या संघर्षाला समर्थन - दामले
एआयटीयूसी महाराष्ट्राचे अध्यक्ष सुकुमार दामले म्हणाल ेकी, बँक कर्मचाऱ्यांच्या या संघर्षाला आमचे समर्थन आहे. बँकेच्या विलिनीकरणामागे छुपा अजेंडा असल्याचा आरोप करीत, त्याविरोधात संघर्ष सुरू ठेवणार आहे.
कर्मचाऱ्यांनी एकजूट ठेवावी - शर्मा
एआयबीईए चे महासचिव बी. एन. शर्मा यांनी संपात सहभागी बँक कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून, या संघर्षाविरुद्ध एकजूट ठेवण्याचे आवाहन केले. पुढे हा संघर्ष आणखी रेटून धरायचा आहे, त्यासाठी तयार राहण्याचे आवाहन केले.
सरकारची धोरणे कर्मचारी विरोधी - गुप्ता
ईस्टर्न महाराष्ट्र बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष रामकुमार गुप्ता म्हणाले की, सरकारचे श्रम व श्रमिक विरोधी धोरणाविरुद्ध एकत्र येऊन संघर्ष करणे गरजेचे आहे. स्टेट बँक आॅफ इंडियाने करिअर प्रोग्रेस स्कीमचे धोरण असोसिएट्स बँकेवर जबरदस्तीने लादले आहे. याचा विरोध करीत, बँकेच्या द्विपक्षीय करारावरही त्यांनी टीका केली.