नागपुरात लॉकडाऊनमुळे कचरा संकलन २१० टनांनी घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 09:50 PM2020-04-13T21:50:51+5:302020-04-13T21:52:41+5:30

जानेवारी ते २० मार्च या दरम्यान शहरात दररोज ११६० ते ११८० टन कचरा निघत होता. तो एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ९५२ टनांवर आला आहे. म्हणजेच दररोजच्या संकलनात २१० टन घट झाली आहे.

Lockdown in Nagpur reduces garbage collection by 210 tonnes | नागपुरात लॉकडाऊनमुळे कचरा संकलन २१० टनांनी घटले

नागपुरात लॉकडाऊनमुळे कचरा संकलन २१० टनांनी घटले

googlenewsNext
ठळक मुद्देदररोजचा कचरा ११८० टनांवरून ९५२ वर आला

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊनमुळे शहरातील बाजार बंद आहेत. रस्त्यांवरील वर्दळही थांबली आहे. यामुळे कचऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. जानेवारी ते २० मार्च या दरम्यान शहरात दररोज ११६० ते ११८० टन कचरा निघत होता. तो एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ९५२ टनांवर आला आहे. म्हणजेच दररोजच्या संकलनात २१० टन घट झाली आहे.मागील वर्षाचा विचार करता दररोज १२३५ टन कचरा संकलित केला जात होता. शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी एजी इन्व्हायरो बीव्हीजी कंपन्यांकडे देण्यात आली. त्यानंतर कचरा संकलन सरासरी ११५० टन कचरा उचलला जात होता. मार्च महिन्याचा विचार करता या महिन्यात सरासरी १० ३६ टन कचरा संकलित करण्यात आला. जानेवारी महिन्यात सरासरी ११८५ टन कचरा उचलण्यात आला तर फेब्रुवारी महिन्यात दररोज सरासरी ११४५ टन कचरा संकलित करण्यात आला. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी २१ मार्चला लॉकडाऊ न घोषित केले. तर पंतप्रधानांनी २५ मार्चपासून लॉकडाऊ नची घोषणा केली. यासोबतच शहरातील मोठ्या बाजारातील मालाची आवक कमी झाली. आठवडी बाजारातील गर्दी कमी झाली. रस्त्यावरील वर्दळही थांबली. यामुळे कचऱ्याचे प्रमाण कमी झाले. परिणामी २१ ते ३१ मार्र्च दरम्यान नागपूर शहरातील कचरा संकलन सरासरी ९५२ टनांवर आले. तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात यात पुन्हा घट झाली आहे. विशेष म्हणजे ओल्या कचऱ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

मागील वर्षी दररोजचे सरासरी संकलन
१२५५ टन जानेवारी-फेब्रुवारी २०२० मधील सरासरी संकलन -११८० टन, मार्च महिन्यातील २० ते ३१ मार्च दरम्यान सरासरी संकलन -८५२ टन.

सफाई कर्मचाऱ्यांचे काम वाढले
लॉकडाऊ नमुळे शहरातील कचरा संकलनात घट झालेली दिसत असली तरी सफाई कर्मचाऱ्यांचे काम वाढले आहे. शहरातील सर्व भागातील रस्ते स्वच्छ केले जात आहेत. फवारणीच्या कामात काही कर्मचारी आहेत. तसेच शहरातील रस्त्यावर पडून असलेली माती, मलबा व कचऱ्याचे ढीग उचलण्याचे काम सुरू आहे. नाले सफाईची जबाबदारीही आली आहे. बाजार बंद असल्याने कचऱ्याचे प्रमाण कमी झाल्याची माहिती आरोग्य अधिकारी (स्वच्छता)डॉ. प्रदीप दासरवार यांनी दिली.

Web Title: Lockdown in Nagpur reduces garbage collection by 210 tonnes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.