"लॉकडाऊन हा उपाय नाही, प्रशासन जो निर्णय घेईल त्याच्या अंमलबजावणीत आम्ही सोबत राहू"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 03:18 PM2021-03-20T15:18:32+5:302021-03-20T16:03:40+5:30

Nagpur News शहरातील लॉकडाऊनच्या संदर्भात पालकमंत्री नितीन राऊत यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी आलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, लॉकडाऊन हा उपाय नाही, मात्र प्रशासन जो निर्णय घेईल त्याच्या अंमलबजावणीत आम्ही सोबत राहू असे प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना सांगितले.

Lockdown is not a solution, we will stick with the implementation of whatever decision the administration takes | "लॉकडाऊन हा उपाय नाही, प्रशासन जो निर्णय घेईल त्याच्या अंमलबजावणीत आम्ही सोबत राहू"

"लॉकडाऊन हा उपाय नाही, प्रशासन जो निर्णय घेईल त्याच्या अंमलबजावणीत आम्ही सोबत राहू"

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर-शहरातील लॉकडाऊनच्या संदर्भात पालकमंत्री नितीन राऊत यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी आलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, लॉकडाऊन हा उपाय नाही, मात्र प्रशासन जो निर्णय घेईल त्याच्या अंमलबजावणीत आम्ही सोबत राहू असे प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना सांगितले.
शनिवारी बोलावण्यात आलेल्या या बैठकीत शहरातील वाढत्या रुग्णसंख्येबाबत चर्चा झाली. यावेळी फडणवीस यांनी,
संपूर्ण लॉकडाऊन हा उपाय नाही. त्यामुळे रोजगार अडचणीत येतो. त्यामुळे कडक निर्बंध लावून व्यवहार व्हावेत असे मत व्यक्त केले. नागपूर शहरात ८८ लसीकरण केंदे्र आहेत. त्यांची संख्या वाढवून ती १५१ व्हायला हवीत. दररोज ८ ते १० हजार नागरिकांना लस दिली जाते आहे. ती ४० हजारापर्यंत दिली जावी असे सांगितले. तसेच
लसीकरणासाठी सब सेंटर्स सुरू व्हावीत व या कामात एनजीओ ची मदत घेतली जावी अशीही सूचना त्यांनी मांडली.
वाढत्या रुग्णसंख्येमुळे सरकारी दवाखान्यात जागा कमी पडते आहे. पुन्हा खाजगी कोविड हॉस्पीटल्स सुरू केले जावेत.
होम क्वारंटाईन असूनही बाहेर फिरणाऱ्यांना पकडून क्वारंटाईन सेंटरवर न्यावे अशीही सूचना मांडली गेली.
प्रशासन जो निर्णय घेईल त्याची अंमलबजावणी करण्यात आम्ही सोबत राहू असे त्यांनी स्पष्ट केले.

Read in English

Web Title: Lockdown is not a solution, we will stick with the implementation of whatever decision the administration takes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.