लॉकडाऊनमुळे लसीकरण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:09 AM2021-03-16T04:09:11+5:302021-03-16T04:09:11+5:30

नागपूर : कोरोना प्रादुर्भावाला नियंत्रणात आणण्यासाठी सोमवारपासून शहरात कडक लॉकडाऊनला सुरुवात झाली. यातून लसीकरण केंद्र व प्रवासी वाहतूक वगळण्यात ...

Lockdown reduced vaccination | लॉकडाऊनमुळे लसीकरण घटले

लॉकडाऊनमुळे लसीकरण घटले

googlenewsNext

नागपूर : कोरोना प्रादुर्भावाला नियंत्रणात आणण्यासाठी सोमवारपासून शहरात कडक लॉकडाऊनला सुरुवात झाली. यातून लसीकरण केंद्र व प्रवासी वाहतूक वगळण्यात आली. तरीही त्याचा प्रभाव लसीकरणावर पडला. १३ मार्च रोजी शहरात ११,२०७ लाभार्थ्यांचे लसीकरण झाले असताना आज १०,३९८ लाभार्थ्यांचे लसीकरण झाले. लॉकडाऊन आणखी सहा दिवस चालणार आहे. सामाजिक संस्था व प्रतिनिधींनी विशेषत: ६० वर्षांवरील ज्येष्ठांना व ४५ वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या लाभार्थ्यांना लसीकरण केंद्रापर्यंत पोहचविण्यासाठी मदत करावी, असे आवाहन केले जात आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला १ मार्चपासून सुरुवात झाली. गंभीर आजाराच्या रुग्णांना व ज्येष्ठांना यात सहभागी करून घेतल्याने लसीकरणाचा वेग वाढला. दरम्यानच्या काळात शहरातील लसीकरणाची केंद्रे वाढवून ६१ करण्यात आली. सोबतच रात्री १० वाजेपर्यंत केंद्रे सुरू ठेवण्यात येत असल्याने लाभार्थ्यांना सोयीचे झाले. लसीकरणाचे प्रमाण वाढले असताना कोरोनाचा प्रादुर्भावही वाढला. मागील सात दिवसांत १२ हजारांवर नव्या रुग्णांची नोंद झाली. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने सोमवारपासून कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला. यातून लसीकरण केंद्र व प्रवासी वाहतुकीला वगळण्यात आले. परंतु त्यानंतरही चौकाचौकात तैनात असलेल्या पोलिसांच्या भीतीने आज लसीकरण कमी झाल्याचे बोलले जात आहे.

-शहरात ५९११ ज्येष्ठांनी घेतली लस

१२ मार्च रोजी एकूण ८८३० लाभार्थ्यांचे लसीकरण झाले. यात ६० वर्षांवरील ५३२४, गंभीर आजार असलेल्या १६१९ लाभार्थ्यांचा समावेश होता. १३ मार्च रोजी लसीकरण वाढून ११,२०७ झाले. यात ६० वर्षांवरील ७१७८ तर गंभीर आजाराचे २४६८ लाभार्थी होते. सोमावरी लॉकडाऊनचा काहीसा परिणाम झाला. १०,३९८ लाभार्थ्यांचे लसीकरण झाले. यात ५९११ ज्येष्ठ तर गंभीर आजाराचे २१२६ लाभार्थी होते.

-ग्रामीणमध्ये ७२९४ ज्येष्ठांचे लसीकरण

रविवारच्या सुटीनंतर आज ग्रामीणमध्ये लसीकरणात वाढ झाली. ग्रामीण भागात लॉकडाऊन नसल्याने याचा फायदा लाभार्थ्यांनी घेतला. ९८८५ लाभार्थ्यांनी लस टोचून घेतली. यात ६० वर्षांवरील ७२९४ तर गंभीर आजार असलेले १३०२ लाभार्थ्यांचा समावेश होता. १३ मार्च रोजी लसीकरणाची संख्या ६५१३ होती. यात ४३५५ ज्येष्ठ तर १०२४ गंभीर आजारातील लाभार्थी होते.

Web Title: Lockdown reduced vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.