नागपुरात लॉकडाऊनमधील जप्त वाहनचालकांचे परवाने रद्द होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 11:33 PM2020-04-02T23:33:44+5:302020-04-02T23:35:15+5:30

लॉकडाऊन आणि पोलिसांनी वारंवार सांगूनही विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या वाहनचालकांची आता खैर नाही. वाहतूक पोलीस वाहनचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करून आरटीओच्या माध्यमातून त्यांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे.

Locked down driver's licenses will be revoked | नागपुरात लॉकडाऊनमधील जप्त वाहनचालकांचे परवाने रद्द होणार

नागपुरात लॉकडाऊनमधील जप्त वाहनचालकांचे परवाने रद्द होणार

Next
ठळक मुद्देपहिल्या दिवशी ७५ वाहनचालकांविरुद्ध गुन्हा दाखल : वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊन आणि पोलिसांनी वारंवार सांगूनही विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या वाहनचालकांची आता खैर नाही. वाहतूक पोलीस वाहनचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करून आरटीओच्या माध्यमातून त्यांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. वाहतूक पोलिसांनी गुरुवारी पहिल्याच दिवशी ७५ वाहने जप्त करून या सर्वांविरुद्ध भादंवि कलम १८८ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
लॉकडाऊन असूनही लोक रस्त्यावर वाहनांसह फिरताना सर्रास दिसून येत आहेत. वाहतूक पोलिसांनी अशा विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या चालकांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. सुरुवातीला वाहनचालकांविरुद्ध चालानची कारवाई करण्यात आली. तरीही लोक ऐकायला तयार नाहीत. त्यामुळे आता वाहने जप्त करणे सुरू केले आहे. आतापर्यंत ५६९ वाहने जप्त करण्यात आली आहेत. वाहने जप्त केल्यानंतरही रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नव्हती. त्यामुळे आता वाहतूक पोलिसांनी अशा चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचे वाहन चालविण्याचे परवाने रद्द करण्यास सुरुवात केली आहे.
वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांच्या नेतृत्वात गुरुवारी ७५ वाहनचालकांविरुद्ध भादंवि कलम १८८ अंतर्गत लॉकडाऊनचे उल्लंघन करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींची वाहने जप्त करण्यात आली आहेत. सर्वाधिक २९ वाहने कामठी चेंबरने जप्त केली आहेत. वाहतूक शाखा येणाºया दिवसात आरटीओकडून आरापींचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याची शिफारस करणार आहे.
वाहतूक शाखेचे उपायुक्त विक्रम साळी यांनी सांगितले की, उपद्रवी आणि गैरजबाबदार लोक लॉकडाऊनचे महत्त्व समजून घ्यायला तयार नाहीत. ते स्वत: आणि आपल्या कुटुंबासह सर्वसामान्य नागरिकांचे जीवन धोक्यात घालत आहेत. कोरोनाशी लढाई सोशल डिस्टन्स आणि घरी राहूनच लढली जाऊ शकते. यानंतरही लोक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. पोलिसांना चकमा देऊन पळून जात आहेत. असे लोक पोलिसांना चकमा तर देऊ शकतात परंतु स्वत:ला आणि आपल्या कुटुंबाला कोरोना विषाणूच्या संसर्गापासून वाचवू शकत नाहीत. त्यामुळेच वाहतूक शाखेने अशा लोकांविरुद्ध गुन्हे दाखल ककरून त्यांचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
पोलीस उपायुक्त साळी यांनी असेही सांगितले की, आरटीओला सांगण्यात येईल की, आरोपी वाहनचालक समाजाप्रति गैरजबाबदार आहेत. त्यांच्या कृत्यामुळे समाजाला धोका निर्माण होतो. त्यामुळे त्यांचा वाहन चालवण्याचा परवाना रद्द करून त्यांना यापासून वंचित ठेवण्यात यावे. याशिवाय दोषी वाहनचालकांविरुद्ध न्यायालयातसुद्धा आरोपपत्र दाखल करण्यात येईल. वाहतूक पोलिसांची ही मोहीम लॉकडाऊन असेपर्यंत सुरू राहील. तेव्हा नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही उपायुक्त साळी यांनी केले आहे.

वाहन सोडविणे कठीण होईल
वाहतूक पोलिसांनी लॉकडाऊनपासून आतापर्यंत ५६९ वाहने जप्त केली आहेत. ही वाहने लॉकडाऊननंतर दंडाची रक्कम भरून सोडवायची होती. गुरुवारी एफआयआर दाखल करणे सुरू झाले आहे. यामुळे वाहने सोडवणे आता कठीण होईल. वाहतूक शाखा आरोपी वाहनचालकांविरुद्ध न्यायालयातही आरोपपत्र दाखल करणार आहे. आरोपी चालकास वाहन सोडवण्यासाठी न्यायालयात अर्ज करावा लागेल. न्यायालयाच्या निर्देशानंतरच वाहतूक शाखा वाहन सोपवेल.

Web Title: Locked down driver's licenses will be revoked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.