लोहीत मतानी परत नागपुरात, उपराजधानीला मिळाले तीन नवीन उपायुक्त

By योगेश पांडे | Published: September 5, 2024 08:50 PM2024-09-05T20:50:36+5:302024-09-05T20:52:00+5:30

नागपुरला एकूण तीन उपायुक्त मिळाले आहेत.

lohit matani returns to nagpur gets three new deputy commissioners | लोहीत मतानी परत नागपुरात, उपराजधानीला मिळाले तीन नवीन उपायुक्त

लोहीत मतानी परत नागपुरात, उपराजधानीला मिळाले तीन नवीन उपायुक्त

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून काही दिवसांअगोदरच भंडाऱ्यातून मुंबईला बदली करण्यात आलेले लोहित मतानी नागपुरात परतले आहेत. नागपुरात त्यांची उपायुक्तपदी बदली झाली आहे. त्यांच्यासोबत नागपुरला एकूण तीन उपायुक्त मिळाले आहेत.

गृहविभागाने गुरुवारी आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीची यादी जाहीर केली. २०२० च्या बॅचमधील महक स्वामी तसेच निथीपुडी रश्मिता राव यांची नागपुरात उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. मतानी यांना नागपुरात काम करण्याचा अनुभव आहे. नागपुरातूनच त्यांची भंडारा येथे अधीक्षकपदी बदली झाली होती. तेथून त्यांची २२ ऑगस्ट रोजी मुंबईत सहायक पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) म्हणून बदली झाली होती. केवळ दोन आठवड्यातच त्यांची परत नागपुरात बदली करण्यात आली आहे. दरम्यान नागपुरातील उपायुक्त निमित गोयल यांची बृहन्मुंबई पोलीस उपायुक्तपदी बदली झाली आहे.

याशिवाय विदर्भालादेखील नवीन दमाचे अधिकारी मिळाले आहेत. सिंगा रेड्डी ऋषिकेश रेड्डी यांची गडचिरोलीत अपर पोलीस अधीक्षकपदी बदली झाली आहे. २०१९ च्या बॅचचे सुशांत सिंह यांची भारत राखीव बटालियन-५ अकोला येथील समादेशक म्हणून बदली झाली आहे. नागपूर पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य लक्ष्मीकांत पाटील यांच्याकडे मुंबईत सायबर सुरक्षा पोलीस अधीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

यासोबतच २०२१ च्या बॅचचे दीपक अग्रवाल यांना नागपूर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी, शुभम कुमार यांना अचलपूर उपविभागीय पोलीस अधिकारी, वृष्टी जैन यांना उमरेड उपविभागीय पोलीस अधिकारी पदी पदस्थापना देण्यात आली आहे.

Web Title: lohit matani returns to nagpur gets three new deputy commissioners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.