Lok Sabha Election 2019; नागपुरात आंबेडकर-ओवेसी गरजणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 10:44 AM2019-03-30T10:44:19+5:302019-03-30T10:45:31+5:30

वंचित बहुजन आघाडीच्या नागपुरात होणाऱ्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातही अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी हे दोघेही येणार असल्याने राजकीय वर्तुळात या सभेविषयी विशेष चर्चा आहे.

Lok Sabha Election 2019; Ambedkar-Owaisi will be in Nagpur | Lok Sabha Election 2019; नागपुरात आंबेडकर-ओवेसी गरजणार

Lok Sabha Election 2019; नागपुरात आंबेडकर-ओवेसी गरजणार

Next
ठळक मुद्देसोमवारी नागपुरात सभा राजकीय गणितांवर प्रभाव

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारिप बहुजन महासंघ व एमआयएमप्रणीत वंचित बहुजन आघाडीच्या जाहीर सभांना होत असलेली प्रचंड गर्दी पाहता यंदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी नवीन राजकीय शक्ती म्हणून उदयास आल्याचे दिसून येते. त्यामुळेच वंचित बहुजन आघाडीच्या नागपुरात होणाऱ्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातही अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी हे दोघेही येणार असल्याने राजकीय वर्तुळात या सभेविषयी विशेष चर्चा आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भारिप-बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे सर्वेसर्वा व असदुद्दीन ओवेसी यांची १ एप्रिलला नागपुरात जाहीर सभा होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सागर डबरासे, रामटेकच्या उमेदवार किरण पाटणकर-रोडगे यांच्या प्रचारासाठी उत्तर नागपुरातील इंदोरा मैदान येथे सायंकाळी ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. तशी परवानगी मागण्यात आली आहे. दरम्यान, एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांची जाहीर सभेच्या यशस्वीतेसाठी बैठक झाली. यात वंचित आघाडीसोबत समन्वय साधून सभा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती आहे. राज्यात वंचित बहुजन आघाडीचे ज्या पद्धतीने यापूर्वी सभा यशस्वी झाल्या आहेत, त्याच धर्तीवर ही सभा होईल, याची तयारी केली जात आहे. काही महिन्यांपूर्वीच वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा नागपुरातील कस्तूरचंद पार्कवर झाली. इतर सभेप्रमाणेच ही सभाही चांगलीच यशस्वी ठरली. त्या सभेत असदुद्दीन ओवेसी हे हजर नव्हते, तरीही सभेला मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. आता अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह स्वत: असदुद्दीन ओवेसी संबोधित करणार असल्याने नागपूर व विदर्भातील एमआयएमचे कार्यकर्तेही कामाला लागले आहेत. सध्या तरी या सभेबद्दल लोकांमध्ये आकर्षण दिसून येत आहे. परंतु प्रकाश आंबेडकर आणि ओवेसींची ही सभा नागपुरातील राजकीय गणितांवर किती प्रभाव पाडू शकेल, हे येणारी वेळच ठरवेल.

Web Title: Lok Sabha Election 2019; Ambedkar-Owaisi will be in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.