Lok Sabha Election 2019; कॅडरला तिकीट मिळाल्याने फरक दिसेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 10:09 AM2019-04-01T10:09:31+5:302019-04-01T10:10:57+5:30

उमेदवारीवरून बसपात कुठलेही अंतर्गत मतभेद नाहीत. उलट अनेक वर्षांनंतर पक्षातील कॅडरमध्ये राबणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यालाच तिकीट मिळाल्यामुळे सर्व कार्यकर्ते उत्साहात असून जोमाने कामाला लागले आहेत, असा दावा बसपाचे नागपूर लोकसभेचे उमेदवार मोहम्मद जमाल यांनी रविवारी पत्रपरिषदेत केला.

Lok Sabha Election 2019; Cadre gets a ticket and the difference will be seen | Lok Sabha Election 2019; कॅडरला तिकीट मिळाल्याने फरक दिसेल

Lok Sabha Election 2019; कॅडरला तिकीट मिळाल्याने फरक दिसेल

googlenewsNext
ठळक मुद्देमो. जमाल यांचा दावा बसपाने सोशल इंजिनिअरिंग साधले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उमेदवारीवरून बसपात कुठलेही अंतर्गत मतभेद नाहीत. उलट अनेक वर्षांनंतर पक्षातील कॅडरमध्ये राबणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यालाच तिकीट मिळाल्यामुळे सर्व कार्यकर्ते उत्साहात असून जोमाने कामाला लागले आहेत, असा दावा बसपाचे नागपूर लोकसभेचे उमेदवार मोहम्मद जमाल यांनी रविवारी पत्रपरिषदेत केला.
जमाल म्हणाले, सोशल मीडियावर करण्यात येत असलेले आरोप चुकीचे आहेत. २००९ मध्ये माणिकराव वैद्य यांना बसपाने उमेदवारी दिली, तेव्हाही अशाच प्रकारचे आरोप झाले. परंतु त्यांनी चांगली मते घेतली होती. यावेळी पक्षाने मला उमेदवारी देऊन सोशल इंजिनियरिंगही साधण्याचा प्रयत्न केला. बसपाने नेहमी आंबेडकरी विचार जपण्याचे काम केले आहे. त्याचा परिणाम यावेळी नक्कीच दिसून येईल.
वंचित बहुजन आघाडी निवडणुकीत उतरल्याने काही नुकसान होणार का? अशी विचारणा केली असता ते केवळ पावसाळ्यातील बेडूक असल्याची टीका केली. भाजपाने महापालिका आर्थिक डबघाईस आणली. काँग्रेसने या विरोधत उघड मौन बाळगले. बसपा ही निवडणूक ज्वलंत मुद्यांवर लढत आहे. त्यामुळे नागपूरकर यावेळी बसपाला पसंती देतील, असा दावाही त्यांनी केला. पत्रपरिषदेत प्रदेश महासचिव पृथ्वी शेंडे, प्रदेश सचिव नागोराव जयकर, प्रभारी योगेश लांजेवार, जिल्हाध्यक्ष विलास सोमकुंवर, शहराध्यक्ष प्रकाश गजभिये, किशोर कैथल, मनोज गजभिये आदी उपस्थित होते.
मायावतींची ५ ला जाहीर सभा
प्रभारी योगेश लांजेवार यांनी सांगितले की, येत्या ५ एप्रिल रोजी बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांची जाहीर सभा कस्तूरचंद पार्कवर होणार आहे. या सभेत विदर्भातील सर्व सातही लोकसभा मतदार संघातील उमेदवार सहभागी होणार आहेत.

Web Title: Lok Sabha Election 2019; Cadre gets a ticket and the difference will be seen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.