Lok Sabha Election 2019; जाती, धर्माचे राजकारण केले नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 11:51 AM2019-04-07T11:51:49+5:302019-04-07T11:53:30+5:30
केंद्रीय मंत्री व नागपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांची मोमीनपुरा येथे प्रचारसभा पार पडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय मंत्री व नागपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांची मोमीनपुरा येथे प्रचारसभा पार पडली. मुस्लीमबहुल भागामध्ये गडकरी यांचे जोशात स्वागत करण्यात आले. यावेळी गडकरी यांनी नागरिकांसमोर नागपुरातील विकासकामांचा आलेखच प्रस्तुत केला.
या सभेला माजी केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री शाहनवाझ हुसैन हेदेखील उपस्थित होते. विकास व सेवा करत असताना जात, पात, धर्म, भाषा यांना स्थान नसले पाहिजे. मी कधीही जाती, धर्माचे राजकारण केले नाही. नागपूरच्या प्रत्येक भागाचा विकास व्हावा हीच माझी प्राथमिकता असते. मध्य नागपुरातील प्रत्येक गल्ली व व्यक्तीला माझे काम माहिती आहे, असे गडकरी म्हणाले. नितीन गडकरी जे बोलतात ते करतात. त्यांच्यासारख्या नेत्यामुळे नागपूरचा कायापालट झाला आहे. देशाच्या प्रगतीतदेखील त्यांचे मौलिक योगदान आहे. त्यांच्या विचारातून नवीन भारत घडेल, असे हुसैन म्हणाले. यावेळी मुस्लीम समाजातील मान्यवर, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.