Lok Sabha Election 2019; नागपूरसाठी के. सारदा देवी केंद्रीय निवडणूक निरीक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 10:52 AM2019-03-27T10:52:54+5:302019-03-27T10:54:08+5:30
निवडणूक आयोगाने आंध्रप्रदेश कॅडरच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी के. सारदा देवी यांची नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निवडणूक आयोगाने आंध्रप्रदेश कॅडरच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी के. सारदा देवी यांची नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. के. सारदा देवी या आंध्रप्रदेश कॅडरच्या २००५ बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघात मुक्त वातावरणात निवडणुका घेण्याच्यादृष्टीने मतदारांसाठी त्या रविभवन येथे उपलब्ध राहणार आहेत. लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकसंदर्भात त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतला. निवडणूक निरीक्षक के. सारदा देवी यांचा मुक्काम रविभवन कॉटेज क्रमांक सी-६ येथे असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९०२२२०८७६३ असा आहे. सर्व मतदारांना त्या सकाळी ११ ते १ या वेळेत रविभवन येथे उपलब्ध आहेत. रविभवन येथील दूरध्वनी क्रमांक ०७१२-२५२२८७६ आहे.