Lok Sabha Election 2019; नागपुरात नऊ हजारावर पोलीस तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 11:43 AM2019-03-12T11:43:31+5:302019-03-12T11:44:51+5:30

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी तब्बल ८ ते ९ हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी पत्रपरिषदेत दिली.

Lok Sabha Election 2019; Nine thousand police deployed in Nagpur | Lok Sabha Election 2019; नागपुरात नऊ हजारावर पोलीस तैनात

Lok Sabha Election 2019; नागपुरात नऊ हजारावर पोलीस तैनात

Next
ठळक मुद्देभूषणकुमार उपाध्यायअसामाजिक तत्त्वांची यादी तयार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी तब्बल ८ ते ९ हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी पत्रपरिषदेत दिली.
डॉ. उपाध्याय यांनी सांगितले की, तब्बल ६ हजार पोलीस कर्मचारी, १ हजार पोलीस अधिकारी, १५०० होमगार्ड तैनात राहतील. यासोबतच सीआरपीएफच्या दोन कंपनीही देण्यात आलेल्या आहेत. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने शहरात फ्लॅग मार्च काढण्यात येईल. निवडणुकीमध्ये जी असामाजिक तत्त्वांची मंडळी गडबड करू शकतात अशा लोकांची यादी तयार करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल. यासोबतच इतर संवेदनशील लोकांविरुद्धही कारवाई केली जाणार आहे. वॉण्टेड लोकांची यादी सुद्धा तयार करण्यात आलेली आहे. तसेच गंभीर गुन्हे असलेल्या गुन्हेगारांवर आवश्यक कारवाई करण्यात येणार असल्याचेही डॉ. उपाध्याय यांनी सांगितले.

१२५ ठिकाणी अचानक होणार नाकेबंदी
नागपुरातील १२५ ठिकाणे अशी निश्चित करण्यात आली आहेत. जिथे वाहतूक आणि पोलीस विभाग मिळून अचानक नाकेबंदी करून वाहनांची तपासणी करतील. जेणेकरून दारूचा साठा किंवा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर काही अवैध कृत्य होऊ नयेत.

नागपूर सीमेवर अतिरिक्त सुरक्षा पथक
नागपूर जिल्ह्याला लागून मध्य प्रदेशची सीमा आहे. निवडणुकीच्या काळात मध्य प्रदेशातून नागपूर जिल्ह्यात दारूचा पुरवठा होता कामा नये किंवा मतदानाच्या दिवशी तिकडील लोक इकडे येता कामा नये, यासाठी सीमवेर अतिरिक्त सुरक्षा ठेवण्यात येईल. तसेच विशेष पथक नियुक्त करण्यात येणार असून १३ तारखेला दोन्ही जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बैठक होणार असल्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सांगितले.

Web Title: Lok Sabha Election 2019; Nine thousand police deployed in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.