Lok Sabha Election 2019; ६७ वर्षांत नागपुरात केवळ १९ महिला उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 03:44 PM2019-03-22T15:44:00+5:302019-03-22T15:49:13+5:30

प्रत्येकच पक्षाकडून महिला सबलीकरण व सक्षमीकरणासंदर्भात मोठेमोठे दावे करण्यात येत असले तरी, प्रत्यक्षात राजकारणात महिलांना प्रतिनिधित्व देण्याबाबत सर्वच ठिकाणी उदासीनता आहे.

Lok Sabha Election 2019; Only 19 women candidates in Nagpur in 67 years | Lok Sabha Election 2019; ६७ वर्षांत नागपुरात केवळ १९ महिला उमेदवार

Lok Sabha Election 2019; ६७ वर्षांत नागपुरात केवळ १९ महिला उमेदवार

Next
ठळक मुद्देमहिला उमेदवारांबाबत पक्षांची उदासीनताचमहिलांची टक्केवारी अवघी ६ टक्के

योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रत्येकच पक्षाकडून महिला सबलीकरण व सक्षमीकरणासंदर्भात मोठेमोठे दावे करण्यात येत असले तरी, प्रत्यक्षात राजकारणात महिलांना प्रतिनिधित्व देण्याबाबत सर्वच ठिकाणी उदासीनता आहे. मागील ६७ वर्षांत नागपुरात केवळ १९ महिला उमेदवार निवडणुकांच्या रिंगणात उतरल्या. यातही अनसूयाबाई काळे वगळता एकाही महिला उमेदवाराला लोकसभेत पोहोचण्यात यश आले नाही.
१९५२ ते २०१४ या कालावधीत नागपूर मतदारसंघात एकूण १६ निवडणुका झाल्या व यात ३०२ उमेदवार उभे राहिले. मात्र यापैकी महिला उमेदवारांची संख्या ही केवळ १९ म्हणजे अगदी ६.२९ टक्के इतकीच होती. १९५२ व १९५७ साली लढण्यात आलेल्या पहिल्या दोन निवडणुकांत काँग्रेसने अनसूयाबाई काळे यांनाच तिकीट दिले होते व मतदारांनीदेखील महिलाशक्तीवर विश्वास टाकला. त्या सलग दोनदा नागपूर मतदारसंघातून निवडून गेल्या होत्या. त्यानंतर पुढील चार निवडणुकांत नागपुरातून एकही महिला निवडणुकीत उभी झाली नाही. त्यानंतर १९८० व १९८४ साली प्रत्येकी एक अपक्ष, १९८९ साली चार अपक्ष महिलांनी भाग्य आजमाविले. १९९६ साली काँग्रेसने कुंदाताई विजयकर यांना उमेदवारी दिली, मात्र त्यांना विजय मिळू शकला नाही. २९.८३ मतांसह त्या दुसऱ्या स्थानी होत्या.
१९९८, २००४ साली परत प्रत्येकी एका अपक्ष महिला निवडणुकीच्या रिंगणात होती. २००९ साली बहुजन रिपब्लिकन एकता मंचतर्फे अ‍ॅड.सुलेखा कुंभारे यांनी अर्ज भरला. याशिवाय प्रतिभा खापर्डे यांनी अपक्ष म्हणून आव्हान दिले. मात्र या दोघींनाही अनुक्रमे ०.१३ व ०.१२ टक्के मतेच प्राप्त झाली.२०१४ सालच्या निवडणूकीत ‘आप’च्या अंजली दमानिया यांची चांगलीच हवा निर्माण झाली होती. मात्र ही हवा मतांमध्ये परिवर्तित होऊ शकली नाही. त्यांना ६.३९ टक्के मतांवरच समाधान मानावे लागले. याशिवाय इतर तीन अपक्ष महिलांनादेखील फारच कमी मतं मिळाली.

काँग्रेसने दिली महिलांना तीनदा उमेदवारी
४१६ निवडणुकांत कॉंग्रेस सोडून इतर प्रस्थापित पक्षांनी महिलांना उमेदवारी देण्यात हात आखडताच घेतल्याचे चित्र दिसून आले. कॉंग्रेसने १९५२,१९५७ व १९९६ साली महिलांना उमेदवारी दिली. ‘आप’ने २०१४ साली महिलेला उमेदवारी दिली. तर बहुजन रिपब्लिकन एकता मंचतर्फे २००९ साली एक महिला उमेदवार उभी झाली. उर्वरित १४ महिलांनी अपक्ष म्हणूनच निवडणूक लढविली. केवळ एक अपवाद वगळता एकाही अपक्ष महिला उमेदवाराला १ टक्क्यांहून अधिक मते मिळविता आली नाही. नोंदणीकृत पक्षांनी महिलांना दिलेल्या उमेदवारीची एकूण उमेदवारांच्या तुलनेतील टक्केवारी ही अवघी १.६६ टक्के ठरली. १९९१ व २०१४ साली सर्वाधिक चार महिला उमेदवार रिंगणात होत्या.

Web Title: Lok Sabha Election 2019; Only 19 women candidates in Nagpur in 67 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.