Lok Sabha Election 2019; आमचा जाहीरनामा; शिक्षण क्षेत्रासाठी नियोजन व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 10:34 AM2019-03-13T10:34:21+5:302019-03-13T10:34:52+5:30

डिजिटल इंडियाचा नारा दिला जात आहे. भविष्याची ती गरजच आहे. परंतु डिजिटल इंडियाचे स्वप्न वास्तवात उतरविण्यासाठी शिक्षण क्षेत्रासाठी नियोजन करण्याची गरज आहे असे मत मनपा शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेश गवरे यांनी व्यक्त केले.

Lok Sabha Election 2019; Our Declaration; Planning for the education sector | Lok Sabha Election 2019; आमचा जाहीरनामा; शिक्षण क्षेत्रासाठी नियोजन व्हावे

Lok Sabha Election 2019; आमचा जाहीरनामा; शिक्षण क्षेत्रासाठी नियोजन व्हावे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: डिजिटल इंडियाचा नारा दिला जात आहे. भविष्याची ती गरजच आहे. परंतु डिजिटल इंडियाचे स्वप्न वास्तवात उतरविण्यासाठी शिक्षण क्षेत्रासाठी नियोजन करण्याची गरज आहे असे मत मनपा शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेश गवरे यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, आज महापालिका व जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाची अवस्था गंभीर आहे. विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान व्हावे यासाठी सुरू करण्यात आलेले महापालिकेच्या १५० शाळांतील संगणक शिक्षण केंद्रे बंद आहेत. मुलांना संगणकाचे ज्ञान कसे मिळणार, शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी उत्तम दर्जाच्या भौतिक सुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे. वर्गखोल्या, शाळांचे बांधकाम, मुख्याध्यापक व शाळा निरीक्षक यांची कमतरता,सुविधांचा अभाव याचा शिक्षणावर परिणाम होतो. दुसरीकडे शिक्षकांचे प्रश्न वर्षानुवर्षे सुटत नाहीत. नियमानुसार मिळणाऱ्या सोयीसुविधांसाठी त्यांना संघर्ष करावा लागतो. आंदोलनात शक्ती खर्च होते. शैक्षणिक वातावरण राहत नाही. महापालिका शाळांतील पटसंख्या कायम राहण्यासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध कराव्यात. शासनाने शिक्षण अनुदानात वाढ करावी. महापालिक ा नागरिकांकडून शिक्षण कर वसूल करीत असल्याने उत्तम दर्जाचे प्राथमिक शिक्षण देण्याची जबाबदारी स्वीकारावी. अर्थसंकल्पात पुरेशी आर्थिक तरतूद करावी. २१ व्या शतकाचा विचार करून भविष्यात उपयोगी पडेल असे शिक्षण देण्याची गरज आहे. यादृष्टीने शासन व महापालिका प्रशासनाने प्रयत्न केले तरच डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार होईल.

Web Title: Lok Sabha Election 2019; Our Declaration; Planning for the education sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.