Lok Sabha Election 2019; रामटेकच्या रणभूमीत १० उमेदवार नवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 10:49 AM2019-03-30T10:49:56+5:302019-03-30T10:50:17+5:30

रामटेकच्या रणभूमीत यावेळी १६ उमेदवार आहे. २०१४ च्या तुलनेत उमेदवारांची संख्या ७ ने कमी झाली असली तरी १० नवीन उमेदवार यावेळी गड सर करण्यासाठी मैदानात उतरले आहेत.

Lok Sabha Election 2019; In Ramtek, 10 candidates are new | Lok Sabha Election 2019; रामटेकच्या रणभूमीत १० उमेदवार नवे

Lok Sabha Election 2019; रामटेकच्या रणभूमीत १० उमेदवार नवे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : रामटेकच्या रणभूमीत यावेळी १६ उमेदवार आहे. २०१४ च्या तुलनेत उमेदवारांची संख्या ७ ने कमी झाली असली तरी १० नवीन उमेदवार यावेळी गड सर करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. यासोबतच गतवेळी लढत देणारे सहा उमेदवार याही वेळी मैदानात कायम आहेत. यात शिवसेनेचे कृपाल तुमाने, कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडियाचे (मार्कसिस्ट-लेनिनिस्ट) बंडू मेश्राम, अपक्ष गौतम वासनिक, डॉ. नत्थूराव लोखंडे, संदेश भालेकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या किरण रोडगे-पाटणकर यांचा समावेश आहे. रोडगे गतवेळी बसपाच्या उमेदवार होत्या यावेळी त्या वंचित बहुजन आघाडीकडून रामटेकच्या रणभूमीत उतरल्या आहे. कॉँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक यावेळी निवडणूक लढत नसल्याने काँग्रेसने माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांना संधी दिली आहे.
यासोबतच रोडके यांनी वंचित बहुजन आघाडीचा आधार घेतल्याने बसपाने येथे सुभाष गजभिये यांना मैदानात उतरविले आहे. त्यामुळे काँग्रेस आणि बसपाला यावेळी रामटेकमध्ये नव्या उमेदवारांना संधी द्यावी लागली. उर्वरित आठ नवीन चेहऱ्यात राष्ट्रीय जनसंभावना पार्टीच्या अर्चना उके, राष्ट्रीय जनसुराज्य पार्टीचे चंद्रभान रामटेके, पीपल्स पार्टी आॅफ इंडिया (डेमोक्रॅटिक) चे डॉ.एल.जे.कान्हेकर, आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियाचे विनोद पाटील, सोशालिस्ट युनिटी सेंटर आॅफ इंडिया (कम्युनिस्ट) शैलेश जनबंधू तर अपक्ष म्हणून अनिल ढोणे, कांतेश्वर तुमाने, सोनाली बागडे नशीब अजमावत आहेत. लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता मतदार संघात प्रचाराला वेग आला आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019; In Ramtek, 10 candidates are new

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.