Lok Sabha Election 2019; काटोलसाठी सेना आग्रही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 10:44 AM2019-03-13T10:44:11+5:302019-03-13T10:46:27+5:30
काटोल विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी शिवसेनेने दंड थोपटले आहे. युतीत ही जागा सेनेच्या वाट्याला येत असल्याने पोटनिवडणुकीत युतीचा उमेदवार सेनेचाच असला पाहिजे, अशी भूमिका या मतदार संघातील पक्ष पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काटोल विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी शिवसेनेने दंड थोपटले आहे. युतीत ही जागा सेनेच्या वाट्याला येत असल्याने पोटनिवडणुकीत युतीचा उमेदवार सेनेचाच असला पाहिजे, अशी भूमिका या मतदार संघातील पक्ष पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. यासंदर्भात मंगळवारी मुंबई येथे मातोश्रीवर झालेल्या बैठकीत पक्ष अधिकाऱ्यांनी काटोलची पोटनिवडणूक सेनेनेच लढावावी, अशी भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडली. या बैठकीत रामटेक लोकसभा मतदार संघाचाही आढावा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला. बैठकीला खा.कृपाल तुमाने, माजी आमदार अॅड.आशिष जयस्वाल, जिल्हा प्रमुख राजेंद्र हरणे, उपजिल्हा प्रमुख पुरुषोत्तम थोटे, उपजिल्हा प्रमुख दिलीप मानकर, देवेंद्र गोडबोले, वर्धमान पिल्ले, तालुका प्रमुख हिंमत नाखले, प्रशांत मानकर उपस्थित होते. इकडे काटोलसाठी भाजपनेही फिल्डिंग लावली आहे. यासंदर्भात इच्छुक उमेदवारांनी पक्षश्रेष्ठीकडे साकडे घातले आहे.शेवटी काटोलबाबतचा अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चर्चेनंतर होईल. मात्र जिल्हा भाजपमधील एक गट ही जागा सेनेला सोडावी या विचाराचा तर दुसरा गट २०१४ मधील विजयाचा दाखला देत आहे.