Lok Sabha Election 2019; इलेक्ट्रॉनिक पोस्टल बॅलेटद्वारे मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 11:16 AM2019-03-27T11:16:27+5:302019-03-27T11:17:00+5:30
लष्करी, केंद्रीय आणि राज्य सशस्त्र पोलीस दलातील जवान (सर्व्हिस व्होटर्स) तसेच प्रशिक्षणासाठी किंवा शासकीय सेवेनिमित्त प्रतिनियुक्तीवर परदेशात असलेल्या भारतीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना यंदा इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीमद्वारे (ईटीपीबीएस) मतदान करता येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लष्करी, केंद्रीय आणि राज्य सशस्त्र पोलीस दलातील जवान (सर्व्हिस व्होटर्स) तसेच प्रशिक्षणासाठी किंवा शासकीय सेवेनिमित्त प्रतिनियुक्तीवर परदेशात असलेल्या भारतीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना यंदा इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीमद्वारे (ईटीपीबीएस) मतदान करता येणार आहे. नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदार संघात सर्व्हिस व्होटर्सची संख्या २ हजार ३९० असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.
भारत निवडणूक आयोगाने यंदाच्या निवडणुकीत ईटीपीबीएस उपलब्ध करून दिली आहे. यावर्षी प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार राज्यात १ लाख ४ हजार ४३५ इतक्या सर्व्हिस व्होटर्सची संख्या आहे. त्यात आतापर्यंत सुुमारे ४ हजाराची भर पडली आहे. सर्व्हिस व्होटर्स नोंदणीची प्रक्रिया अद्यापही सुरू आहे. अंतिम मतदार यादीनुसार १ लाख २ हजार ६१७ पुरुष तर १ हजार ८१८ महिला सर्व्हिस व्होटर्स आहेत.