Lok Sabha Election 2019; सरकारी जाहिरातींचे काय ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 10:59 AM2019-03-14T10:59:15+5:302019-03-14T11:13:17+5:30
आचारसंहितेला तीन दिवस लोटल्यानंतरही प्रशासनाने पेट्रोल पंप, राज्य परिवहन महामंडळाच्या बसवरील अद्यापपर्यंत सरकारी जाहिरातील बॅनर्स, पोस्टर्स काढले ना ही. प्रशासन सरकारी जाहिरातीबाबत अनास्था का बाळगून आहे, असा सवाल नागपूरकर मतदारांकडून करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निवडणूक आयोगाने रविवारी लोकसभा निवडणुकीची घोषणा केली आणि लगेच आदर्श आचारसंहिता लागू झाली. आचारसंहितेला तीन दिवस लोटल्यानंतरही प्रशासनाने पेट्रोल पंप, राज्य परिवहन महामंडळाच्या बसवरील अद्यापपर्यंत सरकारी जाहिरातील बॅनर्स, पोस्टर्स काढले ना ही. प्रशासन सरकारी जाहिरातीबाबत अनास्था का बाळगून आहे, असा सवाल नागपूरकर मतदारांकडून करण्यात येत आहे.
महामंडळाच्या बसेसवर जाहिरातीचे पोस्टर्स
रविवारी आचारसंहिता लागल्यानंतर सोमवारपासून प्रशासनाकडून दिवसभर कारवाई होईल, सर्व बॅनर, पोस्टर काढले जातील, अशी अपेक्षा होती. तीन दिवस झाल्यानंतरही आचारसंहितेची सर्वंकष अंमलबजावणी झाली नाही. प्रशासनाने काही ठिकाणच्या सरकारी जाहिरातींना काढले. पण काही ठिकाणच्या जाहिराती अजूनही कायम आहेत.
पेट्रोल पंपावर दिसताहेत सरकारी जाहिराती
बुधवारी लोकमतच्या टीमने शहरातील विविध भागाचा दौरा केला. पेट्रोल पंपावर सरकारी जाहिरातीचे मोठमोठे होर्डिंग आढळले. काही पेट्रोलपंप चालकांनी आश्चर्यसुद्धा व्यक्त केले की पंपावर लावलेले जाहिरातीचे पोस्टर्स आचारसंहितेचा भंग होत असतानाही हटविले जात नाही. प्रशासनाकडून पोस्टर्स काढण्यास सांगितल्यास आम्ही आपल्या स्तरावर ते काढून टाकू.