Lok Sabha Election Result; आपलीच ‘सीट’ निघणार; राजकीय पक्षांकडून दावे-प्रतिदावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 06:30 AM2019-05-22T06:30:00+5:302019-05-22T06:30:06+5:30

लोकसभा निवडणुकांचे निकाल अवघ्या काही तासांवर आले असताना राजकीय पक्षांमधील धाकधूक वाढली आहे. ‘एक्झिट पोल्स’नंतर काही भाजपा-सेनेच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे तर कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह इतर पक्षांकडून या आकड्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

Lok Sabha Election Result; Our 'seat' will leave; Claims and counterparts from political parties | Lok Sabha Election Result; आपलीच ‘सीट’ निघणार; राजकीय पक्षांकडून दावे-प्रतिदावे

Lok Sabha Election Result; आपलीच ‘सीट’ निघणार; राजकीय पक्षांकडून दावे-प्रतिदावे

Next
ठळक मुद्देसर्वांकडून सुरू आहे मतांच्या गणिताची आकडेमोड

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणुकांचे निकाल अवघ्या काही तासांवर आले असताना राजकीय पक्षांमधील धाकधूक वाढली आहे. ‘एक्झिट पोल्स’नंतर काही भाजपा-सेनेच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे तर कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह इतर पक्षांकडून या आकड्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. निकालात आपलाच उमेदवार जास्त मतं घेणार असा दावा प्रत्येकच राजकीय पक्षाकडून करण्यात येत आहे.
नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी ११ एप्रिल रोजी मतदान झाले होते. त्यानंतर बरेचसे नेते व कार्यकर्ते देशातील विविध भागात होत असलेल्या इतर टप्प्यातील प्रचारात व्यस्त होते. निकालाचा आठवडा आल्यानंतर अनेकांकडून संभाव्य परिस्थितीवर मंथन सुरू झाले आहे. विधानसभानिहाय, जातीनिहाय मतांची टक्केवारी कशी राहील यासंदर्भात बेरीज-वजाबाकी मांडणे सुरू आहे. ‘एक्झिट पोल्स’नुसार नागपूरमध्ये भाजपाचे नितीन गडकरी व रामटेकमध्ये शिवसेनेचे कृपाल तुमाने विजयी होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र याअगोदर अनेकदा ‘पोल्स’ चुकले असून जनतेची साथ आपल्यालाच होती, असा दावा कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. आता नागपूर व रामटेकच्या गडाचे सरदार कोण बनणार हे गुरुवारीच स्पष्ट होणार आहे.

गडकरींचे मताधिक्य वाढेल
‘एक्झिट पोल्स’मधून आलेले आकडे हे निकालांचे संकेतच आहे. देशातील जनतेचा भाजपा सरकारवर विश्वास आहे हेच निकालांतून दिसून येईल. नागपूर व रामटेकमध्ये अनुक्रमे नितीन गडकरी व कृपाल तुमाने हेच विजयी होतील. नागपुरात तर गडकरी यांचे मताधिक्य मागील वेळेपेक्षा आणखी जास्त वाढेल हा आम्हाला विश्वास आहे.
-आ.सुधाकर कोहळे, शहराध्यक्ष, भाजपा

नागपूर, रामटेकमध्ये आघाडीचाच विजय
‘एक्झिट पोल्स’ म्हणजे काही अखेरचा निकाल नसतो. तेथील आकडे काहीही म्हणत असले तरी प्रत्यक्ष परिस्थितीत वेगळी होती. नागपूर व रामटेकमधील निवडणुकीच्या वेळचे मुद्दे, जातीय समीकरण, नागरिकांमधील सत्ताधाऱ्यांबाबतचा रोष या बाबी पाहता दोन्ही ठिकाणी आमचाच विजय होईल. शिवाय यावेळेला थेट लढत होती. इतरांना मतं न पडता ती आघाडीच्या पारड्यात पडली आहेत.
-विकास ठाकरे, शहराध्यक्ष, कॉंग्रेस

‘एक्झिट पोल्स’ विश्वासार्ह नाहीच
जे आकडे ‘एक्झिट पोल’मधून दाखवत आहेत ते विश्वासार्ह नाहीत. मुळात नागपूर व रामटेक मतदारसंघात अनुसूचित जाती, मुस्लिम, ख्रिश्चन, हलबा, आदिवासी यांची मते आघाडीलाच मिळाली आहेत. याशिवाय कॉंग्रेस-राष्ट्रवादीची पारंपारिक मतं आहेतच. युतीला ही मतं मिळालीच नाही. त्यामुळे एकूणच गणित पाहिले असता आघाडीच्या उमेदवारांचे पारडे भारी राहणार असल्याचीच चिन्हे आहेत.
-अनिल अहिरकर, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस

 

 

Web Title: Lok Sabha Election Result; Our 'seat' will leave; Claims and counterparts from political parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.