लोकसभा नागपूर १९५७; नागपूरकरांनी परत टाकला महिलाशक्तीवर विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 01:47 PM2019-03-13T13:47:28+5:302019-03-13T13:48:00+5:30

१९५२ नंतर १९५७ च्या निवडणुकीतदेखील अनसुयाबाई काळे यांच्या गळ््यात विजयश्रीची माळ पडली.

Lok Sabha Nagpur, 1957; Nagpur's backed confidence in women's power | लोकसभा नागपूर १९५७; नागपूरकरांनी परत टाकला महिलाशक्तीवर विश्वास

लोकसभा नागपूर १९५७; नागपूरकरांनी परत टाकला महिलाशक्तीवर विश्वास

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: १९५२ नंतर १९५७ च्या निवडणुकीतदेखील अनसुयाबाई काळे यांच्या गळ््यात विजयश्रीची माळ पडली. १९५२ साली पूर्व विदर्भ महिला परिषदेची स्वतंत्र इमारत उभारण्यासाठी उत्तर अंबाझरी मार्गावर जागा मिळवून दिली. आजवर या इमारतीच्या माध्यमातून हजारो महिलांना आसरा मिळाला आहे. अनसुयाबाई काळे यांनी आपल्या कार्यकाळात महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्यातून आदर्श निर्माण केला होता.
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वात लढलेल्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकांत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळविली होती. १९५२ प्रमाणे १९५७ च्या या निवडणुकांतदेखील नागपूरने इतिहास घडविला. नागपूरच्या पहिल्यावहिल्या खासदार अनसूयाबाई काळे यांनी सातत्याने दुसऱ्यांदा विजय मिळवीत महिलाशक्तीचा परिचय करून दिला होता.
मतदारसंघ पुनर्रचना आयोगाने आठऐवजी विदर्भात नऊ मतदारसंघ तयार केले. यात नागपूरचे स्थान महत्त्वाचे होते. १९५२ ते १९५७ दरम्यानची कामगिरी लक्षात घेता, काँग्रेसने परत अनसूयाबाई काळे यांनाच तिकीट दिले होते. तर ‘आॅल इंडिया शेड्युल कास्ट फेडरेशन’तर्फे हरिदास आवाडे हे कट्टर प्रतिस्पर्धी मानण्यात येत होते. याव्यतिरिक्त नरेंद्र देवघरे हे प्रजा सोशालिस्ट पक्ष तसेच के.डी. परांजपे हे अपक्ष म्हणून उभे होते. केवळ चारच उमेदवार रिंगणात होते व त्यामुळे सर्वांनी आपापल्यापरीने जोरदार प्रचार केला होता. १९५२ च्या तुलनेत या निवडणुकांत मतदान किंचित वाढले व मतदानाची टक्केवारी सुमारे ६० टक्के इतकी होती. अनसूयाबाई काळे यांच्या मतांमध्ये घट झाली, मात्र ४६.८३ टक्के मतं प्राप्त करीत त्यांनीच विजय मिळविला. दुसºया स्थानावर आवाडे राहिले.
त्यांना २८.८६ टक्के मते मिळाली होती. तिसºया स्थानी आलेल्या प्रजा सोशालिस्ट पक्षाच्या उमेदवाराने सर्वांना अचंबित करीत २२.३८ टक्के मतं प्राप्त केली होती. परांजपे यांच्या वाट्याला मात्र केवळ १.९२ टक्के मते आली होती.

विदेशातदेखील दाखविले कर्तृत्व
अनसूयाबाई या नागपूरच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात १९३० पासूनच कार्यरत होत्या. त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शाळा स्थापन केली होती. कॅनडातील अखिल विश्व महिला संमेलनात त्यांनी भारतीय महिलांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. १९२८ मध्ये त्या सी.पी.अ‍ॅन्ड बेरार लेजिल्सेटिव्ह कौन्सिलच्या प्रथम महिला सदस्य म्हणून निवडून आल्या. १९३३ मध्ये महात्मा गांधी यांनी हरिजन दौरा काढला होता. त्यात अनसूयाबाईदेखील महात्मा गांधी यांच्यासोबत मध्य प्रांतात होत्या. १९३५ मध्ये त्या मध्य प्रांत विधानसभेच्या उपाध्यक्ष म्हणूनदेखील निवडून आल्या. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात त्यांनी सरकारी पदाचा त्याग केला व तुरुंगवास देखील भोगला. १९४३ साली चिमूर आष्टी येथे दडपशाहीने हत्याकांड झाले व यात सात जणांना फाशीची शिक्षा झाली. या सात भारतीयांना वाचविण्यासाठी काळे यांनी पुढाकार घेतला.

Web Title: Lok Sabha Nagpur, 1957; Nagpur's backed confidence in women's power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.