लोकजनशक्ती उतरणार विदर्भाच्या आंदोलनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 01:52 AM2017-09-13T01:52:48+5:302017-09-13T01:52:48+5:30

विदर्भ राज्यावर विकासाच्या बाबतीत अन्याय होत आला आहे. नव्याने निर्माण केलेल्या राज्यांपेक्षा विदर्भाची मागणी जुनी आहे. वेळोवेळी आंदोलने करूनही सरकारने दखल घेतलेली नाही.

Lokjan Shakti will come down to Vidarbha's movement | लोकजनशक्ती उतरणार विदर्भाच्या आंदोलनात

लोकजनशक्ती उतरणार विदर्भाच्या आंदोलनात

Next
ठळक मुद्दे२१ सप्टेंबरला पंतप्रधानांना निवेदन : बैठकीत एकमताने निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भ राज्यावर विकासाच्या बाबतीत अन्याय होत आला आहे. नव्याने निर्माण केलेल्या राज्यांपेक्षा विदर्भाची मागणी जुनी आहे. वेळोवेळी आंदोलने करूनही सरकारने दखल घेतलेली नाही. त्यामुळे आता वेगळ्या विदर्भाचे आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार लोकजनशक्ती पार्टीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. विदर्भाच्या मागणीसाठी २१ सप्टेंबर रोजी विदर्भातील सर्व जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिल्हाधिकाºयांमार्फत निवेदन देण्याचा निर्णयही पक्षातर्फे घेण्यात आला.
लोकजनशक्ती पार्टीची बैठक रविभवन येथे रविवारी झाली. अध्यक्षस्थानी विदर्भ प्रदेश अध्यक्ष सतीश लोणारे होते. नागपूर शहर अध्यक्ष प्रेमकुमार मिश्रा यांनी यावेळी विदर्भ लढ्याचा प्रस्ताव मांडला. त्याला विदर्भातील सर्व जिल्ह्यांतील अध्यक्ष व पदाधिकाºयांनी एकमताने मंजुरी दिली. नागपूर शहरातील विविध नागरी समस्या महापालिकेच्या माध्यमातून सोडविण्यासाठी पुढाकार घेतला जाईल, असे अध्यक्ष प्रेमकुमार मिश्रा यांनी सांगितले. यावेळी विविध पक्षातील ४० पदाधिकारी व सक्रिय कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला. बैठकीत बबनराव जारोंडे, कुर्शीद खां पठाण, देवीदास बारसागडे, सुचिता रामटेके, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष मो. रजाक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रंजित सहा, पंकज मनोहरे, सुधीर भगत, विजय भालशंकर, मुरलीधर भनारकर, यशदीप टेंभुर्णे, शिवदास गजभिये, मनोज खोबरागडे, सलीमुदीन काजी, मो. रजाक, वैभव गुप्ता, पंडित तिवारी आदी यावेळी उपस्थित होते. संचालन केशव तितरे यांनी केले. भाऊ दामले यांनी आभार मानले.

Web Title: Lokjan Shakti will come down to Vidarbha's movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.