‘लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वत: कोरडे पाषाण’
By admin | Published: August 9, 2016 02:41 AM2016-08-09T02:41:44+5:302016-08-09T02:41:44+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाकडून मोठमोठे दावे करण्यात येत असले तरी प्रत्यक्ष
योगेश पांडे ल्ल नागपूर
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाकडून मोठमोठे दावे करण्यात येत असले तरी प्रत्यक्ष दिव्याखाली अंधारच असल्याचे अनेकदा दिसून येते. विद्यापीठ ‘आॅनलाईन’ होण्याकडे अग्रेसर असले तरी मूलभूत समस्या कायमच आहे. अद्यापपर्यंत विद्यापीठातील ‘हेल्पलाईन’ सुरू झालेली नाही. परंतु महाविद्यालयांकडून मात्र प्रशासनाला खूप अपेक्षा आहेत. म्हणूनच की काय, सर्व संलग्नित महाविद्यालयांना प्रवेशप्रक्रियेत येणाऱ्या अडथळ्यांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी २४ बाय ७ ‘हेल्पलाईन’ सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नागपूर विद्यापीठात गेल्या कित्येक वर्षांपासून ‘हेल्पलाईन’ अस्तित्वात आलेली नाही. विविध वेळी विविध अधिकाऱ्यांनी यासंदर्भात दावे केले. परंतु प्रत्यक्षात सर्व दावे फायलींच्या आतच दबून राहिले. याचा फटका मात्र विद्यार्थ्यांना प्रचंड प्रमाणात बसतो. प्रवेश प्रक्रियेच्या वेळी विद्यार्थ्यांना लहानलहान गोष्टींसाठी नाहक पायपीट करावी लागते.
प्रशासकीय विभागांनाच हवी ‘हेल्प’
४विद्यापीठ अनुदान आयोगाने १ जून २०१६ रोजी ‘हेल्पलाईन’संदर्भातील पत्र जारी केले होते. उच्च शिक्षण सहसंचालक डॉ.अंजली रहाटगांवकर यांनी ११ जुलै रोजी विद्यापीठाच्या कुलसचिवांच्या नावाने पत्र जारी केले. तर उच्च शिक्षण संचालनालयातर्फे १ जुलै रोजी यासंबंधात पत्र जारी करण्यात आले होते. ‘विद्यापीठ’ शब्दच वगळला. परंतु प्रशासकीय कामाच्या संथपणामुळे विद्यापीठाला निर्देश जारी करण्यासाठी ६ आॅगस्टचा मुहूर्त मिळाला. आश्चर्याची बाब म्हणजे आता अनेक ठिकाणी प्रवेशप्रक्रिया जवळपास पूर्ण होऊन वर्गदेखील सुरू झाले आहेत.