लोकमत कॅम्पस चॅम्प ऑनलाईन स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:08 AM2021-03-09T04:08:51+5:302021-03-09T04:08:51+5:30

- स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दोनच दिवस शिल्लक - पुरस्कार जिंकण्याची संधी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लोकमत कॅम्पस क्लबच्या ...

Lokmat Campus Champ Online Competition | लोकमत कॅम्पस चॅम्प ऑनलाईन स्पर्धा

लोकमत कॅम्पस चॅम्प ऑनलाईन स्पर्धा

googlenewsNext

- स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दोनच दिवस शिल्लक

- पुरस्कार जिंकण्याची संधी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : लोकमत कॅम्पस क्लबच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस चॅम्प २०२१ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही स्पर्धा व उपक्रम जाहीररीत्या घेता येत नसल्याने, ही स्पर्धा ऑनलाईन स्वरूपात आयोजित केली जात आहे. ही स्पर्धा सर्व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांना केवळ आपल्या आवडीच्या स्पर्धेसाठी आपल्या नावाची नोंदणी करणे आवश्यक आहे.

-----------

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशाप्रकारच्या स्पर्धा महत्त्वाच्या ठरतात. म्हणूनच विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होणे गरजेचे आहे. या स्पर्धांतून विद्यार्थ्यांना बरेच काही शिकता येण्यासारखे असते.

- मधुसूदन मुडे, डायरेक्टर, मेजर हेमंत जकाते स्कूल व ज्युनिअर कॉलेज

---------------

स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क : १००/- रुपये प्रत्येकी

* राज्यस्तरीय ऑनलाईन राऊंड : १५ मार्च २०२१

* राज्यस्तरीय निकाल : २० मार्च २०२१

३ पेक्षा जास्त स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकाला विशेष सवलत दिली जाईल.

* नाव नोंदणीसाठी (नागपूर) :-

https://www.townscript.com/e/campuschampngp

* अधिक माहितीसाठी संपर्क करा :- ९८८१७४९३९०, ९८२२४०६५६२

(लोकमत कार्यालयातही नोंदणी सुरू राहील.) Join us on Facebook and like & follow the page:- https://www.facebook.com/lokmatpathshala

---------------

आपला व्हिडिओ १२ मार्चपर्यंत ई-मेल आयडी campusclubngp@gmail.com वर पाठवा किंवा मोबाईल क्रमांक ९८८१७४९३९०, ९८२२४०६५६२ वर व्हॉट्सॲप करा.

---------------

ऑनलाईन स्पर्धा

* फॅन्सी ड्रेस स्पर्धा

* एकल नृत्य स्पर्धा

* गायन आणि वादन

* निबंध स्पर्धा

* वक्तृत्व स्पर्धा

* एकपात्री अभिनय (शेक्सपिअर मोनोलॉग)

-------------

टीप : प्रत्येक स्पर्धेत एकल व सामूहिक गटात प्रथम, द्वितीय, तृतीय आणि प्रोत्साहन पुरस्कार प्रदान केले जातील. सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जातील. प्रत्येक स्पर्धेसाठीचा व्हिडिओ एक ते दोन मिनिटापर्यंतचाच असायला हवा. व्हिडिओ पाठविताना सोबत स्वत:चे नाव, वर्ग, शहर, शाळेचे नाव, मोबाईल क्रमांक, स्पर्धा आणि विषयाच्या नावाचा मॅसेज पाठविणे गरजेचे आहे.

...............

Web Title: Lokmat Campus Champ Online Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.