‘आराधना’, ‘घरकूल’ला लोकमत कार्पोरेट एक्सलन्स अवॉर्ड

By admin | Published: December 11, 2015 12:36 AM2015-12-11T00:36:22+5:302015-12-11T00:36:22+5:30

‘लोकमत कॉर्पोरेट एक्सलन्स अवॉर्ड द्वितीय’चा शानदार पुरस्कार सोहळा, नुकताच वांद्रे येथील ताज लँड्स एन्ड येथे दिमाखात पार पडला.

Lokmat Corporate Excellence Award for 'Aradhana', 'Gharkul' | ‘आराधना’, ‘घरकूल’ला लोकमत कार्पोरेट एक्सलन्स अवॉर्ड

‘आराधना’, ‘घरकूल’ला लोकमत कार्पोरेट एक्सलन्स अवॉर्ड

Next

दखल कर्तृत्त्वाची : वांद्रे येथील ताज लँड्स एन्ड येथे आयोजन
अमरावती : ‘लोकमत कॉर्पोरेट एक्सलन्स अवॉर्ड द्वितीय’चा शानदार पुरस्कार सोहळा, नुकताच वांद्रे येथील ताज लँड्स एन्ड येथे दिमाखात पार पडला. राज्यातील बांधकाम, आरोग्य, शिक्षण आणि रीटेल क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तब्बल ७८ मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील ‘आराधना ग्रुप्स’ व ‘घरकूल’ उद्योग समूहांच्या संचालकांना विविध श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या सोहळ्याला केंद्रीयमंत्री प्रकाश मेहता, ‘लोकमत मीडिया’चे सह-व्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा, ‘लोकमत’चे समूह संपादक दिनकर रायकर, वितरण विभागाचे उपाध्यक्ष वसंत आवारे, सहउपाध्यक्ष विजय शुक्ला व संदीप विष्णोई यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. हा पुरस्कार सोहळा झार्बिया यांनी श्री महालक्ष्मी डेव्हलपर्सच्या सहकार्याने प्रायोजित केला होता. कार्यक्रमात वैयक्तिक व संस्थात्मक स्वरूपात पुरस्कार वितरण करण्यात आले.
त्यामध्ये संस्थात्मक स्वरूपातील पुरस्कारांमध्ये शहरातील आराधना ग्रुपचे संचालक पुरणसेठ हबलानी यांना ‘क्वालिटी एक्सलेन्स’ श्रेणीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला तर शहरातील प्रसिध्द घरकूल उद्योग समूहाचे संचालक अरूण वरणगावकर यांना ‘क्वालिटी एक्सलेन्स अवॉर्ड इन फूड अँड ब्रेव्हिजिअस’ श्रेणीतील पुरस्कार प्रदान करण्यात आला. अरूण वरणगावर यांच्यावतीने सुपुत्र आदित्य वरणगावकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविक भाषणात ऋषी दर्डा यांनी राज्यातील उद्योगधंद्याच्या प्रगतीचा आलेख मांडला. राज्यातील उद्योग अन्य राज्यात जाऊ नयेत, यासाठी राज्य शासनाने उद्योगांना आवश्यक त्या सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्याची अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी ‘लोकमत’च्या या उपक्रमाचे कौतुक केले. (प्रतिनिधी)

Web Title: Lokmat Corporate Excellence Award for 'Aradhana', 'Gharkul'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.