लाेकमतने केला वृत्तपत्र विक्रेत्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2023 10:26 PM2023-06-10T22:26:41+5:302023-06-10T22:27:01+5:30
Nagpur News अतिशय कठीण परिस्थितीचा सामना करीत दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या पाल्यांना शनिवारी ‘लाेकमत’च्या वतीने सन्मानित करण्यात आले. या विद्यार्थ्यांना आकर्षक पारिताेषिक देऊन गाैरविण्यात आले.
नागपूर : अतिशय कठीण परिस्थितीचा सामना करीत दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या पाल्यांना शनिवारी ‘लाेकमत’च्या वतीने सन्मानित करण्यात आले. या विद्यार्थ्यांना आकर्षक पारिताेषिक देऊन गाैरविण्यात आले.
लाेकमत भवनस्थित जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत झालेल्या कार्यक्रमात लाेकमत समूहाचे सहायक उपाध्यक्ष मतीन खान, लाेकमत समाचारचे वरिष्ठ संपादक विकास मिश्रा, लाेकमतचे वरिष्ठ महाव्यवस्थापक (वितरण) संताेष चिपडा व एलएमएसचे मुख्य व्यवस्थापक मुश्ताक शेख प्रामुख्याने उपस्थित हाेते. दहावी व बारावीचे विद्यार्थी पालकांसह या कार्यक्रमात उपस्थित झाले हाेते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मान्यवरांनी त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या मुलांनी कठाेर परिश्रम करून यश प्राप्त केले आहे. मात्र खरी परीक्षा पुढे आहे. परीक्षेत गुण मिळणे महत्त्वाचे आहे; पण त्यापेक्षा या गुणांचा जीवनाचा वाटचालीत कसा उपयाेग करता हे त्यापेक्षा महत्त्वाचे आहे. त्यामुळे मुलांनी पुढच्या वाटचालीसाठी तयार राहावे, असे आवाहन मान्यवरांनी केले. प्रास्ताविक व संचालन वितरण व्यवस्थापक इमरान हुसैन यांनी केले. सत्कार कार्यक्रमाच्या आयाेजनात वितरण व्यवस्थापक विलास तिजारे, शिरीष माेरस्कर, एक्झिक्युटिव्ह अमित खाेडके यांचा सहभाग हाेता.
यांचा झाला गौरव
बारावीचे गुणवंत: सागरिका प्रशांत काळणे (७९.६७), राेहित रवींद्र श्रीरंग (७६.७६)
दहावीचे गुणवंत : पलक प्रवीण बंड (९३.२०), गगन किशाेर साेनेकर (९२.८०), उत्कर्ष मिश्रा (९०.२०), राेहित अनिल कढव (८९), अद्वेय राजेश ठाकरे (८७.४०), अलिशा आसिफ शेख (८७), मिताली संजय भाेंगाडे (८६.६०), रुतुजा संजय खरवाडे (८६.२०), अनुष्का रवि मंगर (८५), मृणाली प्रशांत आगलावे (८५), दर्शिल महेश चंदनखेडे (८३), पायल प्रशांत जाधव (८२.४०), तन्मयी वसंत वासनिक (८१.४०), याेगेश टिकमसिंग शाहू (८१.२०), मयुरेश अरुण शेळके (८१), निखिल रमेश कातुरे (८०.६०), जान्हवी राम पाेकले (८०.२०), वैदेही अनिल हरिणखेडे (७९), ध्रुव चक्रधर काळे (७८), हर्षल संदीप नारायणे (७५.६०), कार्तिक महावीर साखरे (७४.४०)